ETV Bharat / bharat

यास्मीन वानखेडेंची मंत्री नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार, महिला आयोगाला लिहिले पत्र

author img

By

Published : Oct 27, 2021, 7:31 AM IST

Updated : Oct 27, 2021, 10:23 PM IST

Breaking
Breaking

20:58 October 27

यास्मीन वानखेडेची मंत्री नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार, महिला आयोगाला लिहिले पत्र

  • Mumbai | NCB Sameer Wankhede's sister Yasmeen Wankhede writes to National Commission for Women requesting "to safeguard her constitutional rights as a woman." She has also filed a police complaint to register FIR against Maharashtra minister Nawab Malik.

    (file pic) pic.twitter.com/u7Y40Nh9U8

    — ANI (@ANI) October 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात यास्मीन यांनी विनंती केली आहे की 'एक महिला म्हणून तिच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे.' यास्मीन वानखेडेने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांत तक्रारही केली आहे.

20:13 October 27

वानखेडेविरोधात ठोस पुरावे मिळेपर्यंत तेच क्रूझ ड्रग्ज प्रकरणी तपास अधिकारी राहतील - एनसीबीचे उपमहासंचालक

चौकशीनंतर बाहेर येताना समीर वानखेडे

मुंबई - समीर वानखेडे यांची बुधवारी (दि. 27) चौकशी करण्यात आली. मागितलेली प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे त्यांनी सादर केली. गरज पडल्यास त्यांची आणखी चौकशी केली जाईल. त्यांच्याविरुद्ध ठोस माहिती किंवा पुरावे मिळेपर्यंत समीर वानखेडेच क्रूझ ड्रग्ज  प्रकरणात तपास अधिकारी म्हणून राहतील, असे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले. चौकशीनंतर बाहेर पडताना समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.

19:37 October 27

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीकडून अंडरवर्ल्डची धमकी - शर्लिन चोप्रा

मुंबई - राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मला अंडरवर्ल्डची धमकी दिली आहे, असा आरोप शर्लिन चोप्राने केला आहे. ती म्हणाली, माझ्यावर अब्रुनुकसानिचा दावा दाखल केला आहे. पण, मी घाबरणार नाही. मी पोलिसांनी विनंती करते की, मी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी.

19:17 October 27

समीर वानखेडेंची चार तास चौकशी

मुंबई - वांद्रे येथील सीआरपीएफच्या गेस्ट हाऊसमध्ये समीर वानखेडे यांची चार तास चौकशी करण्यात आली. चार तासानंतर समीर वानखेडे गेस्ट हाऊसमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळणे.

19:08 October 27

कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या 81 वरून 92 होणार

मुंबई - आजच्या मंत्रिमंडळ बाठकीत कोल्हापूर महापनगरपालिकेची सदस्यसंख्या 81 वरून 92 झाली आहे.

17:50 October 27

एनसीबीचा दुसरा पंच शेखर कांबळे कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल

नवी मुंबई - एनसीबीचा दुसरा पंच शेखर कांबळे कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. समीर वानखेडे आणि अनिल माने हे मला अधूनमधून फोन करत होते. समीर वानखेडेंवर बनावट कारवाईचा आरोप आहे. तसेच कारण नसताना आम्ही यात अडकलो आहोत. खारघरमधली ती कारवाई बनावट असल्याचा दावा दुसरा पंच शेखर कांबळेने केला आहे.

17:06 October 27

अभिनेत्री काम्या पंजाबीने केला काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई - अभिनेत्री काम्या पंजाबी हीने मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


 

16:57 October 27

धुळे : एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

धुळे - दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

16:34 October 27

जलशिवार योजनेला 'क्लिनचीट' नाही - राज्य सरकार

जलशिवार योजनेला क्लिनचीट नाही, असे राज्य सरकारचे स्पष्टीकरण

15:03 October 27

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का, 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाणे - उल्हासनगरमधील भाजपचे 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. सर्व नगरसेवक कलानी गटाचे आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत कलानी गटाचे सर्व 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

14:47 October 27

महागाई भत्त्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण

जालना - थकित महागाई भत्त्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण
 

14:08 October 27

कोल्हापूर - मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळी गजाआड

कोल्हापूर फ्लॅश

कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला केलं गजाआड

34 मोबाईल पोलिसांनी केले जप्त

कर्नाटकातील पाच जणांना कोल्हापूर पोलिसांनी ठोकला बेड्या

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

13:24 October 27

B.E.S.T. ची तेजस्विनी बस आज सकाळी दादर येथे एका डंपर लॉरीला धडकली

मुंबई - B.E.S.T. ची तेजस्विनी बस आज सकाळी दादर येथे एका डंपर लॉरीला धडकली.

सहा जण जखमी.

ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर सहा महिला जखमी

सायन रुग्णालयात दाखल. सकाळी ७ वाजताची घटना

13:07 October 27

उल्हासनगरमधील भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश

ब्रेकिंग

उल्हासनगरमधील भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश

सर्व नगरसेवक कलानी गटाचे आहेत

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश

12:41 October 27

माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली - ज्ञानदेव वानखेडे

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जातीचा दाखला प्रसारमाध्यमांना दाखविला. या दाखल्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे असे नाव असल्याचा उल्लेख असल्याचे ज्ञानदेव वानखेडेंनी सांगितले. यावेळी नवाब मलिक यांच्या आरोपाचे खंडन करत त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे ते म्हणाले. समीर आणि पहिल्या पत्नीत कायदेशीर घटस्फोट झाल्याचेही ते म्हणाले. कायदेशीर कागदपत्रांमध्ये ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली आहे असेही ते म्हणाले.

11:57 October 27

एनसीबीचे पाच सदस्यीय पथक दिल्लीहून मुंबईत दाखल

डीडीजी एनसीबी ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह एनसीबीचे पाच सदस्यीय पथक दिल्लीहून मुंबईत दाखल

मुंबईतील ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची ही टीम चौकशी करणार

11:49 October 27

एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत

Nagpur Flash

महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेसह १८ युनियन एकत्र येऊन एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे DA देण्यात अशी मागणी. 

राज्य शासनाप्रमाणे वेतनवाढ व घरभाडे भत्ता देण्यात यावा तसेच १५००० दिवाळी भेट व सण अग्रिम ₹ १२५००  देण्याची मागणी आ

आजपासून बेमुदत उपोषण करण्याचे नियोजन

परंतु प्रशासनाने फक्त ५% महागाई भत्त्यात वाढ २५०० दिवाळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा एसटी कर्मचाऱ्यांचा आरोप

11:20 October 27

कॅ अमरेंद्र सिंग यांची नवीन पक्षाची घोषणा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांची नवीन पक्ष स्थापनेची घोषणा

पत्रकार परिषद घेऊन केली नवीन पक्षाची घोषणा

भाजपमध्ये जाणार असल्यासंदर्भातील बातम्यांना पूर्णविराम

08:57 October 27

मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो केला ट्विट

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक समीर वानखेडेंच्या विरोधात दररोज नव-नवीन खुलासे करत आहेत. आजदेखील त्यांना एक ट्विट केलं आहे. यामध्ये समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो ट्विट करून स्वीट कपल असा उल्लेख केला आहे. तसेच समीर वानखेडे यांच्या 'लग्नाचा निकाहनामा' देखील ट्विट केले आहे.

08:26 October 27

समिर वानखेडे यांच्या चौकशीची शक्यता

एनसीबी अधिकारी वानखेडे यांच्या चौकशीची शक्यता

दिल्लीतून तीन अधिकारी त्यासाठी रवाना झाल्याची माहिती

त्यांच्यावरील कथित आरोपांसंदर्भात चौकशी होण्याची शक्यता

07:21 October 27

Breaking News - एनसीबी अधिकारी वानखेडे मुंबईत परतले

एनसीबी अधिकारी वानखेडे मुंबईत परतले

वानखेडे कामानिमित्त दिल्लीला रवाना झाले होते

काल रात्री उशिरा ते मुंबईला परतले

ते आज आर्यन केस संदर्भात कोर्टात हजर राहण्याची शक्यता

Last Updated : Oct 27, 2021, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.