ETV Bharat / bharat

काँग्रेसने संसदेत माफी मागावी, आधीर रंजन यांच्या 'राष्ट्रपत्नी' शब्दावर भाजप आक्रमक

author img

By

Published : Jul 28, 2022, 1:40 PM IST

लोकसभेतील काँग्रेसचे नेते ( Adhir Ranjan news ) अधिर रंजन यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ( BJP aggressive on Adhir Ranjan rashtra patni remark) यांना राष्ट्रपत्नी म्हणून संबोधले होते. यावर आता सत्ताधारी ( President Droupadi Murmu ) भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. देशातील सर्वोच्च पदावरून बसलेल्या आदिवासी महिलेचा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी ( Smriti irani demand apology from congress ) अशी मागणी भाजपने केली आहे.

BJP aggressive on Adhir Ranjan rashtra patni remark
आधीर रंजन राष्ट्रपत्नी वक्तव्य

नवी दिल्ली - लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिर रंजन ( Adhir Ranjan news ) यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी ( President Droupadi Murmu ) म्हणून संबोधले होते. यावर आता सत्ताधारी भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. देशातील सर्वोच्च पदावरून बसलेल्या आदिवासी महिलेचा अनादर केल्याप्रकरणी ( BJP aggressive on Adhir Ranjan rashtra patni remark) काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. चौधरी यांनी बुधवारी एका खासगी चॅनलच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपत्नी म्हणून संबोधित केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने ( Smriti irani demand apology from congress ) काँग्रेसला धारेवर धरले आहे.

  • #WATCH | BJP MPs in Parliament protest against Congress MP Adhir Ranjan Chowdhury, demand apology from him, on his 'Rashtrapatni' remark against President Droupadi Murmu in a video clip pic.twitter.com/zPovbGfLfM

    — ANI (@ANI) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - कर्नाटकात पीडितेने 12 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराची आता केली तक्रार, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्मृती इराणी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल - द्रौपदी मुर्मू यांना देशाची पत्नी म्हणून संबोधणे हे भारताच्या प्रत्येक मूल्य आणि संस्काराच्या विरोधात आहे. एका पुरुष काँग्रेस नेत्याने हे घृणास्पद कृत्य केले आहे. हे संबोधन त्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का देत आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या. तसेत त्यांनी काँग्रेसचे वर्णन आदिवासी, गरीब आणि महिला विरोधी पक्ष असे केले. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार बनवल्यापासूनच काँग्रेस त्यांची थट्टा करत आहे, असा आरोप देखील इराणी यांनी केला. तसेच काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी स्मृती इराणी यांनी केली.

  • The Congressman knew that this way to address the Pres of India not only demeans her constitutional post but also the rich tribal legacy she represents. He knew that to demean Pres in such fashion is to demean the potential of women in our country: Union minister Smriti Irani pic.twitter.com/w0IcCek11b

    — ANI (@ANI) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


देशाची माफी मागितली पाहिजे - एक आदिवासी, गरीब महिला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान आहे हे सत्य काँग्रेसला अजूनही मान्य नाही. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसलेल्या एका महिलेचा अनादर करणे हे बरोबर नाही. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसने हे मूल्यहीन आणि संविधानाला अपायकारक कृत्य केले आहे. काँग्रेस आणि त्यांच्या संसदेत आणि रस्त्यावरच्या नेत्यांनी देशाच्या प्रथम नागरिकाची आणि देशाची माफी मागितली पाहिजे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही - माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी चुकून राष्ट्रपत्नी म्हणालो. आता यासाठी मला फाशी द्यावीशी वाटत असेल तर तुम्ही देऊ शकता, सत्ताधारी विचारपूर्वक षड्यंत्र रचून तीळाचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अधीर चौधरी म्हणाले. यावर, अधीर रंजन यांनी आधीच चूक मान्य केली होती, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली.

  • "There is no question of apologising. I had mistakenly said 'Rashtrapatni', now if you want to hang me for it, then you can...the ruling party in a deliberate design trying to make mountain out of a molehill," says Congress MP Adhir Chowdhury on his 'Rashtrapatni' remark pic.twitter.com/PglyMbdxHB

    — ANI (@ANI) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • #WATCH | "He has already apologised," says Congress interim president Sonia Gandhi on party's Adhir Chowdhury's 'Rashtrapatni' remark against President Droupadi Murmu pic.twitter.com/YHeBkIPe9a

    — ANI (@ANI) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Asia Cup 2022: आशिया चषक '२०२२' स्पर्धेचे ठिकाण बदलले; UAE येथे होणार असल्याची जय शाहांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.