ETV Bharat / bharat

Bihar Crime News : पतीला खुंटीला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार, दरवाजा तोडून घुसले होते बदमाश

author img

By

Published : Jul 23, 2023, 10:29 PM IST

बिहारमधील अररिया येथे तीन तरुणांनी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर गावकऱ्यांनी एका तरुणाला पकडले तर दोघे पळून गेले. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

Bihar Crime News
Bihar Crime News

अररिया (बिहार) : बिहारमधील अररियामधून सामूहिक बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने गावातील तीन तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने आरोप केला आहे की, शनिवारी ती घरात जेवण करून कुटुंबासोबत झोपली होती. तेव्हा तीन तरुणांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी आधी तिच्या नवऱ्याला खुंटीला बांधून मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

एकाला पकडले, दोघे फरार : ही घटना नरपतगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली आहे. येथे शनिवारी रात्री उशिरा एका 32 वर्षीय विवाहित महिलेवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून महिलेचा पती आणि आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळावरून एका आरोपीला पकडले. तर दोन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. महिलेने नरपतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाची ओळख पटली आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडितेच्या अर्जावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून चौकशीनंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. - शैलेशकुमार पांडे, पोलीस अधिकारी

गावकऱ्यांनी तरुणाला पकडले : महिलेने सांगितले की, पतीने विरोध केल्यानंतरक तीन तरुणांनी त्याला खुंटीला बांधले आणि मारहाण केली. घटनेदरम्यान महिला व तिच्या पतीच्या आरडाओरड्याने आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच नरपतगंज पोलिस स्टेशनचे पोलिस पथक पोहोचले आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आरोपी तरुणाची गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाची पोलीस ठाण्यात चौकशी करून रविवारी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

हेही वाचा :

  1. Crime News : विवाहित महिलेने प्रियकराला चाकूने भोसकले; 'हे' आहे कारण
  2. Firing At Drinking Party : गुन्हेगारांच्या पार्टीत झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी, आरोपी फरार
  3. Demanding money sending Nude Photos : पैसे लवकर पाठवा नाहीतर...; पत्नीचे नग्न फोटो व्हाट्सअपवर पाठवून पैशाची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.