ETV Bharat / bharat

Breaking News - प्रभाकर साईलला NCB कडून समन्स, उद्या चौकशीसाठी बोलावले

author img

By

Published : Oct 26, 2021, 7:26 AM IST

Updated : Oct 26, 2021, 10:19 PM IST

Breaking news
Breaking news

22:17 October 26

प्रभाकर साईलला NCB कडून समन्स, उद्या चौकशीसाठी बोलावले

मुंबई - आर्यन खान ड्रग केस प्रकरणी प्रभाकर साईलला NCB ने समन्स बजावला आहे. उद्या चौकशीसाठी साईलाल बोलावण्यात आले आहे.

17:34 October 26

नवाब मलिक गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांच्या भेटीला

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

17:03 October 26

एनसीबी अधिकारी वानखेडे दिल्लीत दाखल

NCB मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्लीला पोहोचलेड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यावर झालेल्या आरोपामुळे "मला समन्स बजावण्यात आलेले नाही.  

मी इथे वेगळ्या हेतूने आलो आहे. माझ्यावरील आरोप निराधार आहेत," असे वानखेडे यांनी सांगितले.

16:36 October 26

24 किलो चरससह चौघांना अटक

राजस्थानहून मुंबईला नेत असलेल्या 14.4 कोटी रुपयांच्या 24 किलो चरससह 2 महिलांसह चौघांना अटक करण्यात आली. सर्व आरोपी मुंबईतील पवई भागातील रहिवासी, असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.

16:27 October 26

मंत्रालयातील इंटरनेट सेवा खंडित; कामकाज खोळंबले

सुमारे 15 ते 20 मिनिटापासून इंटरनेट सेवा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे

15:28 October 26

ठाण्यात राजीव गांधी परिसरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी फरार झाले आहे. गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत आहे.

15:25 October 26

मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू

गेले काही दिवस क्राईम ब्रांच युनिट 6 आणि 7 कारवाई करत होते. दरम्यान माहिती मिळाली की काश्मीरच्या अनेक भागातून चरस मुंबईत येत आहे, अशी माहिती गुन्हे शाखा डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

15:24 October 26

आर्यन खानचे वकील मुकुल रोहोतागी उच्च न्यायालयात दाखल, थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार

आर्यन खानचे वकील मुकुल रोहोतागी उच्च न्यायालयात दाखल, थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार

15:09 October 26

जालन्यात विद्यार्थीनीला अश्लिल मॅसेज, उपप्राचार्यांवर गुन्हा दाखल

जालन्यातील जेईएस महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांवर विद्यार्थिनीला अश्लील मॅसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पगारे असे आरोपी उपप्रचार्याचे नाव असून बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाजार पोलीस तपास करत आहेत.

15:01 October 26

नागपूर महापालिका निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी विरुद्ध राज्य सरकार वाद पेटला

रमाई घरकुल योजनेच्या 3 हजार कुटुंबांना महाविकास आघाडीने अद्यापही घर दिले नसल्याचे आरोप भाजपाकडून केला जात आहे. गेल्या 15 वर्षांपासून भाजपाची नागपूर महानगर पालिकेवर सत्ता आहे. त्यामुळे सत्ता टिकविण्याचे आवाहन भाजपा समोर असून राज्य सरकारकडून निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

14:17 October 26

प्रभाकर साहील याने सर्व आरोप फेटाळले

प्रभाकर साहील याने पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळले. आपला कोणत्याही डीलशी काहीही संबध नाही असे सांगितले. आपण स्वच्छ चारित्र्याचा नागरिक असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

13:50 October 26

मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवासासाठी संपूर्ण लसीकरण अनिवार्य

अत्यावश्यक कामगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवासासाठी संपूर्ण लसीकरण अनिवार्य: महाराष्ट्र सरकार

13:48 October 26

आर्यन खानच्या वकिलांकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

आर्यन खानच्या वकिलांकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

प्रभाकर साहिल याने लावलेल्या आरोपाची आमचा काहीही संबंध नाही

किरण गोसावी आणि प्रभाकर साहिल ओळाखत नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद

13:48 October 26

11:41 October 26

२४ किलो चरस बाळगल्याप्रकरणी चार जणांना अटक

राजस्थानहून मुंबईला आणले जात असलेले १.४४ कोटी रुपयांचे २४ किलो चरस बाळगल्याप्रकरणी २ पुरुष, २ महिला अशा चार जणांना काल अटक करण्यात आली. सर्व आरोपी पवईचे रहिवासी आहेत.

10:20 October 26

ठाण्यातील वागळे इस्टेट मधील एका बारा मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग

ठाण्यातील वागळे इस्टेट मधील एका बारा मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पहाटे अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 16 जणांना सुखरूप बाहेर काढले

कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली.

09:38 October 26

मोहित कंबोज मलिक यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार

मोहित भारतीय अर्थात मोहित कंबोज यांनी ट्विट करुन आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत मियाँ विरुद्ध फौजदारी मानहानीची तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार आणि मंत्री नवाब मल्लिक यांच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे असे त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनीे तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही या ट्विटमध्ये करण्यात आली आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओही स्टिंग ऑपरेशन करुन ट्विटरवर शेअर केला आहे.

09:23 October 26

सतीश माने शिंदे आणि अमित देसाई नंतर मुकुल रोहोतागी आर्यनचे नवीन वकील

सतीश माने शिंदे आणि अमित देसाई नंतर मुकुल रोहोतागी आर्यनचे नवीन वकील

आर्यानच्या बाजूने आज ज्येष्ठ वकिल आणि भारताचे माजी attorney general मुकुल रोहोतागी करणार मुंबई उच्च न्यायालयात करणार युक्तीवाद

आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी

08:59 October 26

सिरम इन्स्टीट्यूट परिसरात बिबट्याचा हल्ला

पुणे - सिरम इन्स्टीट्यूट परिसरात बिबट्याचा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. एका इसमावर बिबट्याने हल्ला केला. आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एकावर बिबट्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस व वनविभागाचे कर्मचारी येथे दाखल झाले असून, बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

07:42 October 26

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज उच्च न्याायालयात सुनावणी

मुंबई ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयात फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज आर्यन खानला दिलासा मिळतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

07:13 October 26

Breaking live page

केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना पाठवलेल्या निनावी पत्रावर एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांसह कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे एनसीबी म्हटले आहे.

Last Updated : Oct 26, 2021, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.