ETV Bharat / bharat

#दिल्ली हिंसाचार : आयबी अधिकारी हत्याप्रकरणी आप नेत्याचा सहभाग असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

author img

By

Published : Feb 27, 2020, 12:13 PM IST

आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या इमारतीतील लोकांनी दगडफेक केल्याने आपला मुलगा ठार झाला असल्याचा आरोप अंकित शर्मा यांच्या वडिलांनी केला. मात्र, ताहिर हुसेन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

IB officer Ankit Sharma KILLED
दिल्ली हिंसाचार आयबी अधिकारी हत्या प्रकरण

नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांची दिल्लीतील हिंसाचारादरम्यान हत्या झाली. आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या इमारतीतील लोकांनी दगडफेक केल्याने आपला मुलगा ठार झाला असल्याचा आरोप अंकित शर्मा यांच्या वडिलांनी केला. मात्र, ताहिर हुसेन यांनी हा आरोप फेटाळून लावला असून घाणेरड्या राजकारणात आपल्याला ओढले जात असल्याचे म्हटले आहे.

आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांची प्रतिक्रिया...

बुधवारी ईशान्य दिल्लीच्या चांद बाग भागात इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी (गुप्तचर विभाग) अंकित शर्मा यांचा मृतदेह सापडला होता. कामावरून घरी येत असताना त्यांची हत्या झाली. शर्मा यांच्या हत्येत चांदबाग येथील आप नेता आणि नगरसेवक ताहिर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मृत आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या वडीलांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... CAA हिंसाचार: दिल्लीतील अमेरिकन, फ्रान्स, रशियन नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचे ताहिर हुसेन यांनी खंडन केले आहे. आपल्याला या घाणेरड्या राजकारणात ओढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या वक्तव्यानंतर हे सर्व घडले असून आपला त्याच्याशी संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... दिल्ली हिंसाचार : केंद्र सरकारवर रजनीकांत भडकले, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात एका पोलीस हेड कॉन्स्टेबलसह किमान 28 जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या जाळपोळीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.