ETV Bharat / bharat

केरळमधील मंदिर उत्सवाचे एक आकर्षक लघुचित्र

author img

By

Published : Apr 30, 2020, 3:09 PM IST

लॉकडाऊनच्या काळात एका व्यक्तीने कुडाल मानिक्यम मंदिराचे एक आकर्षक चित्र तयार केले आहे.

Lockdown art: A fascinating miniature of Kerala's temple festival
Lockdown art: A fascinating miniature of Kerala's temple festival

तिरुवनंतपूरम - त्रिश्शूर पूरम हा केरळ राज्यामधील एक लोकप्रिय धार्मिक महोत्सव आहे. हा महोत्सव दरवर्षी त्रिश्शूर पूरमच्या कुंडल माणिक्यम मंदिरामध्ये भरवला जातो. मात्र, यावर्षी कोरोना संकटात हा उत्सव साजरा होणार नसल्याची चिन्हे आहेत. यातच लॉकडाऊनच्या काळात एका व्यक्तीने कुडाल मानिक्यम मंदिराचे एक आकर्षक चित्र तयार केले आहे.

रतीश उन्नी असे मंदिराचे लघुचित्र तयार करणाऱया व्यक्तीचे नाव आहे. ते गांधीग्राम येथील रहिवासी आहेत. कुंडल माणिक्यम मंदिरातील सर्व उत्सव आणि भव्यता लहानपणापासूनच प्रत्येक वर्षी पाहत आलेले आहेत. उत्सावाची लघू प्रतिकृती तयार करण्याची त्यांची इच्छा होती. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी त्यावर काम करण्यास सुरवात केली असून एक भाग पूर्ण केला आहे.

सध्या रतीश उन्नी उत्सवातील हत्तीचा देखावा तयार करण्याच्या प्रकियेत आहेत. त्यांनी मंदिराचे सूक्ष्म मॉडेल सागवान लाकडाने बनविले आहे. ते 8 फूट लांब आणि 5.5 फूट रुंद आहे. ते मंदिरातील उत्सव हुबेहूब करत आहेत.

कुंडल माणिक्यम भारथा मंदिर, इरिंजालकुडा येथील 4 एकर जागेमध्ये विखुरलेले आहे. मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे असलेल्या या मंदिराला भारतातील मंदिरांमध्ये एक सन्माननीय स्थान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.