ETV Bharat / bharat

देशात आतापर्यंत 23 हजार 727 जणांचा कोरोनाने मृत्यू; देशातील आढावा एका क्लिकवर...

author img

By

Published : Jul 15, 2020, 2:40 AM IST

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासात देशात 28 हजार 498 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे.

corona
कोरोना

हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासात देशात 28 हजार 498 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून, 553 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांची एकूण संख्या 9 लाख 6 हजार 752 इतक झाला आहे. देशात मंगळवारपर्यंत (14 जुलै) 23 हजार 727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

corona
देशातील कोरोनाचा आढावा एका क्लिकवर...
  • महाराष्ट्र -

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या सहा हजाराच्या पार झाली आहे. आज दिवसभरात ६ हजार ७४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४९ हजार ००७ झाली आहे. दिलासादायक म्हणजे कोरोना रिकव्हरी रेट ५५.६७ टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.

  • नवी दिल्ली -

राजधानी दिल्लीत सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. दिल्लीतील जवळपास 20 हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील जवळपास 15 टक्के लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. 26 जून ते 6 जुलैपर्यंत दिल्लीतील सर्व जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

  • बिहार -

बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. राज्यातील काही नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील भाजप कार्यालयातील 30 जणांना कोरोना झाला आहे. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी बिहारमध्ये 16 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत कडक लॉ़कडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

  • हिमाचल प्रदेश -

राज्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 48 तासात कोरोनाच्या नव्या 111 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच राज्यात कोरोनाचे 345 अॅक्टिव्ह रुग्ण असून, एकूण 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • राजस्थान -

राजस्थानमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथील अलवरमधील व्यापारी संघटनांची व जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. दरम्यान, सोमवार व मंगळवारी येथील सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. तर, इतर दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बाजारपेठा चालू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

  • ओडिशा

राज्यात मंगळवारी दिवसभरात 609 नवे कोरोनाबाधित आढळले असून, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 14 हजार 280 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 4 हजार 929 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, 9 हजार 255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

  • हरियाणा

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सुरुवातीला इतर राज्यातील रुग्णांना परवानगीशिवाय चंदीगडमधील पीजीआयमध्ये भरती करण्यात येत होते. मात्र, आता परवानगी असेल तरच पीजीआयमध्ये भरती केले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.