ETV Bharat / bharat

'संपूर्ण काश्मीर खोरे रेड झोन म्हणून हाताळले जाईल'

author img

By

Published : May 2, 2020, 12:56 PM IST

संपूर्ण खोरे रेड झोन म्हणून मानली जाईल आणि अशा परिस्थितीत परवानगी असलेल्या खेरीज कोणत्याही सवलतीस परवानगी देण्यात येणार नाही, अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

COVID-19: Entire Kashmir Valley to be treated as Red Zone
COVID-19: Entire Kashmir Valley to be treated as Red Zone

श्रीनगर - केंद्र सरकारच्या योजनेनुसार कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काश्मीर विभागात फक्त चार जिल्ह्यांना रेड झोन म्हणून वर्गीकृत केले आहे. परंतु, संपूर्ण खोरे रेड झोन म्हणून मानली जाईल आणि अशा परिस्थितीत परवानगी असलेल्या खेरीज कोणत्याही सवलतीस परवानगी देण्यात येणार नाही, अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

राष्ट्रीय लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑरेंज झोन आणि रेड झोनमध्ये थोडाच फरक आहे. पुढील आदेश येईपर्यंत सर्व दहा जिल्ह्यांना रेड झोन मानले जाईल, असे काश्मीरचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

काश्मीरमध्ये फक्त एकच पुलवामा जिल्हा ग्रीन झोन म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बांदीपोरा, श्रीनगर, शोपिया व अनंतनाग हे चार जिल्हा रेड झोनमध्ये वर्गीकृत केले आहेत. तर काश्मीर विभागातील इतर पाच जिल्हे, कुलगाम, शोपियान, बडगाम, गांदरबल आणि बारामुल्ला या विभागांचे ऑरेंज झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.