ETV Bharat / bharat

44th Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या समारोप समारंभात दिसली तामिळनाडूच्या सांस्कृतिक वारशाची झलक

author img

By

Published : Aug 10, 2022, 12:45 PM IST

चेन्नई येथे आयोजित 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 ( 44th Chess Olympiad ) चा समारोप समारंभात, तामिळनाडूचा सांस्कृतिक वारसा दिसून आला. या कार्यक्रमाला विश्वनाथन आनंदही उपस्थित होते.

44th Chess Olympiad
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या समारोप

चेन्नई: 44 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा मंगळवारी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात समारोप ( 44th chess olympiad closing ceremony ) झाला. ज्यामध्ये भारत ब संघाने खुल्या गटात आणि भारत अ संघाने महिला गटात कांस्यपदक जिंकले. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Tamil Nadu CM MK Stalin ) म्हणाले, "राज्य सरकार क्रीडा क्षेत्रात राज्याला अव्वल स्थानावर नेण्यासाठी अनेक योजना राबवत आहे.

  • It's with a sense of accomplishment, gratitude & pride, I dare to say that Chennai has exceeded all the expectations in successfully conducting the #44thChessOlympiad & made a mark for itself on the global stage. Today's closing ceremony opens new avenue of opportunities for TN. pic.twitter.com/9Pircwgdzd

    — M.K.Stalin (@mkstalin) August 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तामिळनाडूला क्रीडा क्षेत्रात अव्वल स्थानावर नेण्यासाठी अनेक योजना -

स्टॅलिन म्हणाले की, खेळाडू आणि अधिकारी केवळ आठवणीच सोबत घेऊन जाणार नाहीत, तर तमिळ खाद्यपदार्थांची परंपरा, संस्कृती आणि चवही त्यांच्यासोबत घेऊन जातील. ते म्हणाले की, तामिळनाडूला क्रीडा क्षेत्रात अव्वल स्थानावर नेण्यासाठी राज्य सरकारने अनेक योजना तयार केल्या असून त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. यावेळी मुख्य सचिव व्ही इराई अंबू, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष संजय कपूर आणि भारतीय संघाचे मार्गदर्शक विश्वनाथन आनंद उपस्थित ( Indian team guide Viswanathan Anand present ) होते. तामिळनाडूचे क्रीडा विकास मंत्री शिव व्ही मायानाथन म्हणाले, आम्ही इतिहास घडवला आहे.

बुद्धिबळाची जन्मभूमी असलेल्या भारताचे कौतुक -

तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र सरकारचे सहकार्य व मदतीबद्दल त्यांनी आभार मानले. राज्याच्या इतिहासातील हा एक समृद्ध अध्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. FIDE चे अध्यक्ष अर्काडी वार्कोविक ( FIDE President Arkady Varkovic ) यांनी सांगितले की, चेन्नईमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील आदरातिथ्याबद्दल त्यांनी आनंद व कृतज्ञता व्यक्त केली. बुद्धिबळाची जन्मभूमी असलेल्या भारताचे त्यांनी कौतुक देखील केले.

जल्लीकट्टू सारख्या तमिळनाडूच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन ( Showcasing rich cultural heritage of Tamil Nadu ) करणारे कार्यक्रम सादर करण्यात आले आणि ऑलिम्पियाडच्या समारोप समारंभात प्रभावी मैफिली आयोजित करण्यात आल्या. तमीज मान या नेत्रदीपक नृत्य-नाट्य कार्यक्रमाद्वारे तामिळनाडूच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आपला आवाज दिला. तामिळनाडूमध्ये राहणारा भारताचा बुद्धिबळातील पहिला आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू मॅन्युएल अॅरॉन ( International master player Manuel Aaron ) आणि अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

हेही वाचा - 44th Chess Olympiad : खुल्या गटात भारत 'ब' संघाला कांस्य, तर महिला गटात 'अ' संघ तिसऱ्या स्थानी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.