महाराष्ट्र

maharashtra

IND vs ENG 4th Test 2nd Day : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारतानं गमावल्या सात विकेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 9:55 AM IST

Updated : Feb 24, 2024, 6:05 PM IST

IND vs ENG 4th Test 2nd Day : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी रांचीत खेळली जात आहे. दिवसअखेर टीम इंडियानं 7 विकेट गमावून 219 धावा केल्या. संघाकडून ध्रुव जुरेल (30) कुलदीप यादव (17) धांवावर फलंदाजी करत आहेत. भारत सध्या 134 धावांनी मागे आहे. इंग्लंडनं पहिल्या डावात 353 धावा केल्या.

IND vs ENG 4th Test 2nd Day
IND vs ENG 4th Test 2nd Day

रांची IND vs ENG 4th Test 2nd Day : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळवला जात आहे. शनिवारी खेळल्या जात असलेल्या समान्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही इंग्लंडचं सामन्यात वर्चस्व दिसून आलंय. इंग्लंडनं पहिल्या डावात 353 धावां केल्या. प्रत्युत्तरात भारताची अवस्था बिकट दिसत आहे. खेळ थांबला तेव्हा, भारतानं 73 षटकांत 7 गडी गमावून 219 धावा केल्या. ध्रुव जुरेल तसंच कुलदीप यादव क्रिजवर आहेत. दोघांनी आठव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली आहे. जुरेल 20 तसंच कुलदीप 17 धावांवर नाबाद आहे.

रोहित शर्माच्या रूपानं भारताला पहिला धक्का : भारताला पहिला धक्का कर्णधार रोहित शर्माच्या रूपानं बसला. हिटमॅनला इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं 2 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर यशस्वी जैस्वाल- शुभमन गिल यांनी डावाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. बशीरनं 25व्या षटकात शुभमन गिलला एलबीडब्ल्यू करून भारताला दुसरा धक्का दिला. गिल धावा करून बाद झाला. यानंतर बशीरनं 35व्या षटकात रजत पाटीदार (17) तसंच 37व्या षटकात रवींद्र जडेजा (12) यांना पायचीत केलं. बशीरनं 47व्या षटकात यशस्वीला बोल्ड केलं. टॉम हार्टलीनं 52 व्या षटकात सर्फराज खान (14) तसंच 56व्या षटकात आर. अश्विनला (1)बाद केले.

जो रूटनं दिलं महत्त्वपूर्ण योगदान :इंग्लंडच्या डावाबद्दल बोलायचं झालं तर, जो रूटनं 122 धावांची नाबाद खेळी करत संघाला 353 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक 4 बळी घेतले, तर आकाशदीपनं 3 बळी घेतले. इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात 7 गडी गमावून 302 धावांवर केली. दुसऱ्या दिवशी संघानं 51 धावा जोडल्या. भारताकडून शेवटच्या तीन विकेट जडेजानं मिळवल्या. जड्डूनं सर्वप्रथम रूट-रॉबिन्सनची शतकी भागीदारी मोडली. रॉबिन्सन वैयक्तिक 58 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजानं शोएब बशीर आणि जेम्स अँडरसनची विकेट मिळवली केली.

कसा होता पहिला दिवस? : भारतीय संघासाठी पहिली कसोटी खेळणाऱ्या आकाश दीपनं शानदार गोलंदाजी करत 3 बळी घेतले. त्यानंच भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला त्यानं 11 धावांलवर बाद केलं. त्यानंतर त्यानं लगेच ओली पोपला शून्यावर माघारी पाठवलं. तसंच आकाशनं झॅकी क्रोलीची विकेटही घेतली. क्रॉलीनं 42 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या विस्कळीत झालेल्या डावाची जबाबदारी रुटनं घेतली. त्यानं पहिल्या दिवशी नाबाद शतक झळकावलं. रुटनं 226 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. या खेळीत त्यानं 9 चौकार मारले. तर यष्टिरक्षक बेन फोक्सनं 47 धावांचं योगदान दिलं. ओली रॉबिन्सन 31 धावा करुन नाबाद राहिलाय. अशाप्रकारे इंग्लंडनं पहिल्या दिवशी 7 विकेट गमावून 302 धावा केल्या.

आकाश दीप यशस्वी गोलंदाज : भारतीय संघाकडून आकाश दीप आणि सिराजनं शानदार गोलंदाजी केली. आकाशनं 17 षटकात 70 धावा देत 3 बळी घेतले. तर सिराजनं 13 षटका 60 धावा देत 2 बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनाही प्रत्येकी एक बळी मिळाला.

हेही वाचा :

  1. WPL MI vs DC : विकेट, चौकार, षटकार,...; पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबईनं शेवटच्या चेंडूवर जिंकला हरलेला सामना
  2. सामना संपताच कर्नाटकच्या क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
  3. IND vs ENG 4th Test : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंड 302/7; जो रूटनं ठोकलं शतक
Last Updated : Feb 24, 2024, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details