महाराष्ट्र

maharashtra

ईशा देओलनं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 44वा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा - DHARMENDRA HEMA WEDDING ANNIVERSARY

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 3:52 PM IST

Dharmendra Hema Malini's 44th Wedding Anniversary: ईशा देओलनं आई-वडील धर्मेंद्र-हेमा मालिनी यांच्या लग्नाच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर एक सुंदर फोटोही शेअर केला आहे.

Dharmendra Hema Malini's 44th Wedding Anniversary
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाचा 44वा वाढदिवस

मुंबई - Dharmendra Hema wedding anniversary : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर जोडप्यांपैकी एक असलेले धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आज 2 मे रोजी त्यांच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या विशेष प्रसंगी अनेक चाहते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. याशिवाय धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलनं आपल्या पालकांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, "माझ्या वडिलांना आणि आईला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी दोघांवर प्रेम करते आणि मला तुम्हाला मीठी मारायची आहे."

हेमा मालिनी आणि धर्मेंद्रचं लग्न :फोटोमध्ये हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या खांद्यावर डोके टेकवताना दिसत आहेत. या दोघांची जोडी खूप सुंदर असल्याचं अनेकजण पोस्टवर प्रतिक्रिया देऊन सांगत आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा विवाह 1980 मध्ये झाला. त्यांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत. हेमा ही धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आहे. या जोडप्याला त्याच्या लग्नापासून दोन मुले सनी देओल आणि बॉबी देओल आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट 1970 मध्ये 'तुम हसीन मैं जवान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या दोघांनीही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

ईशा देओल केला प्रचार :यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र विवाहित असूनही हेमा मालिनीनं 1980 मध्ये त्यांच्याबरोबर लग्न केलं. अलीकडेच ईशा आणि तिची बहीण अहाना मथुरेत त्यांच्या आईसाठी प्रचार करताना दिसल्या. दरम्यान ईशानं मथुरा आणि वृंदावनमधील विकासाबद्दल बोलताना म्हटलं, "मथुरेबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे, मी खूप दिवसानंतर येथे येत आहे आणि येथे खूप विकास झाला आहे. इथे येऊन खूप छान वाटलं." मथुरेच्या रहिवाशांच्या पाठिंब्यावर प्रकाश टाकत ईशानं निवडणुकीत तिची आई विजयी होईल यावर विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. पुष्पा चक्रीवादळाचा उद्रेक होणार : करण जोहरनं 'पुष्पा पुष्पा' गाण्यातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं केलं कौतुक - Pushpa song
  2. 'इंडियन आयडॉल'च्या स्टेजवर गोविंदानं मुलगा यशबरोबर केला सुंदर डान्स, व्हिडिओ व्हायरल - GOVINDA DANCE VIDEO
  3. छोट्या मुलानं आंटी म्हटल्यावर माधुरी दीक्षितनं दिली 'ही' प्रतिक्रिया - Madhuri Dixit

ABOUT THE AUTHOR

...view details