महाराष्ट्र

maharashtra

टायगर श्रॉफनं अक्षय कुमारला केलं 'एप्रिल फूल', प्रॅंक व्हिडिओ व्हायरल - APRIL FOOL

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 2:14 PM IST

APRIL FOOL : 1 एप्रिल दिवस हा आनंदाचा आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर हा अक्षयबरोबर प्रॅंक करताना दिसत आहे.

APRIL FOOL
एप्रिल फूल

मुंबई - APRIL FOOL : 'एप्रिल फूल' हा एक मजेदार दिवस आहे. आज 1 एप्रिल रोजी अनेकजण आपल्या ओळखीच्या लोकांना मुर्ख बनवून हा दिवस साजरा करतात. लक्षात ठेवा की या दिवशी फक्त तुमच्या ओळखीच्या व्यक्तींनाच एप्रिल फूल बनवा, नाहीतर तुम्ही भांडण ओढवून घेऊ शकता. या सुंदर दिवशी 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील स्टार्स अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी खूप मस्ती केली आहे. 'एप्रिल फूल'ला टायगरनं अक्षय कुमारला चांगलंच फसवलंय. त्याच्याबरेबर जबरदस्त प्रँक केला आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या ॲक्शनपॅक जोडीनं आता चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

टायगर अक्षयबरोबर केला प्रँक :अक्षय आणि टायगरनं चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ शर्टलेस होऊन थंड कोक पेयाची बाटली हलवताना दिसत आहे. यानंतर अक्षय कुमार बागेत शिरताना दिसतो. अक्षय येताच टायगर त्याला कोल्ड ड्रिंकची बॉटल देण्यास सांगतो. यानंतर अक्षय ती बॉटल उघडताच गॅसने भरलेली कोल्ड ड्रिंक थेट अक्षयच्या तोंडावर फवाऱ्याप्रमाणे उउडते आणि पार्श्वभूमीत गाणे वाजते... 'एप्रिल फूल बनाया', यानंतर तिथे सर्व लोक हसतात. अक्षय आणि टायगरचा हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर अनेकजण भरभरून कमेंट्स करत आहेत.

अक्षय कुमार घेणार बदला? : आता टायगरनं अक्षयला एप्रिल फूल बनवले आहे. अक्षय त्याला देखील फूल बनवणार असा अंदाज अनेकजण लावत आहेत. आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, ''टायगर तुला आता अक्षय सोडणार नाही तो नक्कीचं काहीतरी करेल आज तू सावध राहा.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, '' मला अक्षय आणि टायगरचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे, अक्षय तू पण प्रँक कर.'' आणखी एकानं लिहिलं, ''अक्षयबरोबर मोय मोय झालं आहे. होळीचा हा बदला आहे.'' काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. अक्षय आणि टायगर स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie
  2. अमिताभ बच्चनला आठवला धोकादायक स्टंट्स, ना सुरक्षा कवच ना व्हिएफएक्स - Amitabh Bachchan dangerous stunts
  3. विजय देवरकोंडा ने अपने पहले फिल्मफेयर को किया था नीलाम, मिले पैसों को किया दान, बोले- ये सबसे खूबसूरत मेमोरी... - Vijay Deverakonda

ABOUT THE AUTHOR

...view details