महाराष्ट्र

maharashtra

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ; वेळ उलटूनही पेपर न मिळाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

By

Published : Oct 25, 2021, 4:03 AM IST

पुणे - आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ सुरूच आहे. आज मुंबई, पुणे, नाशिक येथील आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. राज्यभरातुन अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये आले होते. परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या पायातील बूट हातातील घड्याळ सर्व साहित्य काढून घ्यायला लावले. ज्या परिक्षार्थींचा ज्या विषयाशी काहीही संबंध नसताना त्यांना अशा विषयांचे पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली. सर्व परीक्षार्थी शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर जमले. त्यांच्याशी ईटीव्ही भारत प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांना आलेल्या समस्या मांडल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details