Sanjay Gaikwad : उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला 'तो' सल्ला ऐकावा - संजय गायकवाड
बुलढाणा:राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर रोजच दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप आणि एकमेकात कलगीतुरा रंगत असतो. यातच नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या नादी लागून बळी पडू नका असा सल्ला दिला होता. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या सल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे जुने जाणते नेते असून, त्यांनी दिलेला सल्ला किंबहुना त्यांचे स्वतःचे मनोगत हे खरे आहे. कारण की, केव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात होईल हे कळणार नाही, असे संजय गायकवाड यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीत चढाओड - गायकवाड पुढे म्हणाले की, दररोज महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ, छोटा भाऊ यावर चढावर सुरू असताना, ज्याचे आमदार, लोकप्रतिनिधी जास्त निवडून येतात तोच मोठा भाऊ असतो. हे आज नाही तर भाजप-शिवसेनापासून सुरू असलेली परंपरा आहे. तसेच मी कोणतेही मंत्रीपद मागितले नाही. जिल्ह्यात मात्र एक मंत्री असावा असा आग्रह राहीला आहे. तसे आमचे जवळपास 22 खासदार आणि शंभरच्या वर आमदार निवडून येतील असाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. तर एकंदरीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे गट यांच्यात चांगला कलगीतुरा रंगलेला दिसतो आहे. त्याचे प्रत्यारोपच्या फायरी एकमेकावर दाबल्या जात आहे, एवढे मात्र निश्चित आहे.