महाराष्ट्र

maharashtra

Aftab Execution : आफताबच्या फाशीसाठी राज्य महिला आयोगाचे राष्ट्रीय महिला आयोगाला लिहिले पत्र

By

Published : Nov 29, 2022, 10:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

सोलापूर: रुपाली चाकणकर (State Womens Commission Chairperson Rupali Chakankar) यांनी 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत सोलापुरातील पीडित महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिलांबाबतचे गुन्हे जाणून घेतले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. श्रद्धा वालकर (Shraddha murder case) विषयावर बोलताना त्यांनी संताप व्यक्त करत त्या म्हणाल्या की, श्रद्धाची हत्या ही निंदनीय असून माणुसकीला काळिमा फसणारी आहे,या घटनेची तात्काळ दखल घेऊन राज्य महिला आयोगाने (State Commission for Women ) राष्ट्रीय महिला आयोगाला (National Commission for Women) पत्र लिहिले आहे. आफताब पुनावाला याला फाशी (Aftab Execution) व्हावी असे त्या पत्रात नमूद केले असल्याची माहिती यावेळी चाकणकर यांनी दिली.
Last Updated :Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details