महाराष्ट्र

maharashtra

Ganeshotsav 2022 शनिपार तरुण मंडळ साकारणार चिंतामणी महालचा भव्य देखावा

By

Published : Aug 23, 2022, 1:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

दोन वर्षानंतर गणेशोत्सव Ganeshotsav 2022 मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. त्यामध्ये पुण्यातील गणेश मंडळाचे जे देखावे आहेत. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यामध्ये येत असतात. पुण्यात असे अनेक गणेश मंडळ आहेत, जे सामाजिक व धार्मिक विषयांच्या आधारावर देखावे सादर करतात. यावर्षी शनिपार तरुण मंडळातर्फे Shanipar Tarun Mandal, चिंतामणी महाल grand spectacle of Chintamani Mahal चा देखावा तयार करण्यात येत आहे. शनिपार तरुण मंडळ हे पुण्यातील अनोखे देखावे सादरकरण्यासाठी प्रसिद्ध असलेले मंडळ आहे. या मंडळाकडून यावर्षी अष्टविनायक दर्शनाचा of Ashtavinayaka Darshan चिंतामणी महालाचा भव्य देखावा उभारला जात आहे. यासाठी मुंबईवरून आलेले 25 कलाकार रात्रंदिवस काम करीत आहे. पंधरा दिवस अगोदरपासूनच मंडळाची महाल उभा करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्याचबरोबर इतर सर्व सामाजिक उपक्रम सुद्धा मंडळातर्फे राबवले जाणार आहेत. त्या कोरोनाच्या संकटानंतर मंडळांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घेऊन तयारी केलेली दिसत आहे. गणेशोत्सव हा जल्लोषात उत्साहात साजरा करणार असल्याचे, मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details