महाराष्ट्र

maharashtra

Shiv Sena March Video : खासदार धैर्यशील मानेंना मतदारसंघात फिरू देणार नाही, २ लाखांची शिवसैनिकाने लावली पैज

By

Published : Jul 26, 2022, 12:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

कोल्हापूर : 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिक विनायक विभुते ( Shiv Sainik Vinayak Vibhute ) यांनी धैर्यशील माने हेच निवडून येतील, अशी पैज लावली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याबरोबर त्यांनी तब्बल 2 लाखांची पैज लावली ( Shiv Sainik Bet Rs 2 lakh ) होती. मात्र, आता धैर्यशील माने ( MP Dhairyasheel Mane ) हेच शिवसेनेला तसेच उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे गुरव आता चांगलेच संतप्त झाले आहेत. आज खासदार माने यांच्या घरावर काढण्यात आलेल्या मोर्चातसुद्धा ते सर्वात पुढे पाहायला मिळाले. ज्यांच्यासाठी निवडणूक काळात आम्ही रक्ताचे पाणी केले, त्यांनीच विश्वासघात केल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. शिवाय आपण शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आला आहात, त्यामुळे तत्काळ राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे. आम्ही शिवसैनिक मोठ्या मतांनी आपला पराभव करू, असेही ते म्हणाले. 5 लाखांची पैज लावतो आपला पराभव निश्चित होईल, असेही ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details