महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole on Sharad Pawar Resignation : शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णयावर नाना पटोले म्हणाले...

By

Published : May 2, 2023, 4:20 PM IST

नाना पटोले

मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार म्हणाले, की मी पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही. कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे. अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. या घोषणेनंतर काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, शरद पवार यांनी आज अध्यक्षपदावरून राजीनामा दिला आहे. हा निर्णय घेण्यामागे काय कारण आहे, हे सांगणे कठीण आहे. मीडियामध्ये शरद पवार यांच्याबद्दल जे काही यायचे किंवा त्याच्या परिवारात काही असो किंवा त्यांच्या तब्बेतीबाबत असो. ही गोष्ट आत्ता सांगून काहीच अर्थ नाही कारण, जेव्हा त्यांची भेट होईल तेव्हा त्यांच्याशी बोलता येईल. आत्ता बोलणे योग्य नाही, असे नाना पटोले म्हणाले. मला वाटत होते की, शरद पवार त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय जीवनात राहतील. नेहमी एका विचारधारेशी लढत राहणार, असेच मला वाटत होते परंतु, कुठल्या कारणामुळे राजीनामा दिला हे सांगणे अद्याप कठीण आहे. सभागृहात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्ते म्हणाले, जोपर्यंत शरद पवार हा निर्णय मागे घेणार नाही, तोपर्यंत आम्ही सभागृहातच राहणार आहे. तसेच हा निर्णय आमच्यापैकी कोणालाही मान्य नाही. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. शरद पवार यांनी आत्तापर्यंत लोकांसाठी काम केले आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details