महाराष्ट्र

maharashtra

रिल्स बनवण्यासाठी मुलीला गाडीच्या हँडलवर बसवून धोकादायक स्टंट.. आता होणार कारवाई, पहा व्हिडीओ

ETV Bharat / videos

Bike Stunt Video रिल्स बनवण्यासाठी दुचाकीवर धोकादायक स्टंट.. आता होणार कारवाई, पहा व्हिडीओ

By

Published : Feb 17, 2023, 6:12 PM IST

छिंदवाडा (मध्यप्रदेश): शहरातील एका तरुणाचा धोकादायक स्टंट करताना व्हिडिओ समोर आला आहे. स्टंट करताना एक तरुण आपल्या बाईकच्या हॅण्डलवर बसून तरुणीला वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा व्हिडिओ शूट करण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. यासोबतच सोशल मीडिया रिल्ससाठी लोकांना जीव धोक्यात न घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते.

ओळख पटवून कारवाई होणार: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्रॅफिक डीएसपी सुदेश सिंह यांनी सांगितले की, अशा प्रकारे रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडून खुलेआम स्टंटबाजी करणे गुन्हाच्या श्रेणीत येते. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्टंट करणार्‍याची ओळख होईल. त्यानंतर कारवाई केली जाईल. अंडर ब्रिजजवळ तरुण-तरुणी स्टंटबाजी करताना दिसतात. छिंदवाडा ते नागपूरला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून तेथे सतत वाहनांची वर्दळ असते. असे धोकादायक स्टंट करून स्वतःच्या जीवासह इतरांचा जीव धोक्यात घालत होते. स्टंट करणाऱ्या तरुणाने हेल्मेट घातले असले तरी त्याच्या साथीदार असलेल्या मुलीने हेल्मेट घातले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे देखील नियमांचे उल्लंघन आहे.

यापूर्वीही व्हिडीओ झाले होते व्हायरल: काही महिन्यांपूर्वी परशिया परिसरातही अशाच पद्धतीने बाईक स्टंट करणाऱ्या तरुणांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, त्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. स्टंट करणाऱ्यांना पोलिसांनी ओळखले नाही. पुन्हा एकदा पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. दुचाकीवर स्टंट करण्यात येत असलेला हा आता दुसरा व्हिडीओ आहे. पोलिसांकडून अशा स्टंट करणाऱ्यांवर कारवाई झाल्यास असे व्हिडीओ काढण्याचे प्रकार कमी होण्याची शक्यता आहे. 

 रिल्स बनवण्यासाठी खटाटोप:नुकतेच व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस जगभरात साजरा करण्यात आला. परंतु या दिवशी असा व्हिडिओ एमपीमधून समोर आला ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. हा व्हिडीओ इमलीखेडा येथील मुख्य रस्त्यावरील नागपूर रोडच्या अंडर ब्रिजजवळ काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण बाईकवर बसून वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे. हे सर्व काम सोशल मीडिया रिल्स बनवण्यासाठी करण्यात आले असल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा: Uttarakhand Snowfall उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी.. सगळीकडे पसरली बर्फाची चादर, पहा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details