महाराष्ट्र

maharashtra

Buldhana Bus Accident : अपघातातील 24 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार; आमदार संजय गायकवाड यांची माहिती

By

Published : Jul 2, 2023, 12:20 PM IST

आमदार संजय गायकवाड

बुलडाणा - समृद्धी महामार्गावर (Bus Accident on Samruddhi Expressway) शनिवारी खाजगी बसचा अपघात झाला होता. या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह बुलडाण्यातील सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले होते. या मृतदेहांवर सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईकांच्या संमतीने प्रशासनाने घेतला होता. मात्र, एका मृतदेहावर मुस्लिम पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती बुलडाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. शनिवारी पहाटे बुलडाणा येथील समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. ही खासगी बस नागपूरवरून समृद्धी महामार्गाने पुण्याकडे जात होती. त्याचदरम्यान बसला अपघात झाला आणि भीषण आग लागली. यातील 24 मृतदेहांवर सामूहित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details