महाराष्ट्र

maharashtra

मुख्यमंत्र्यांनी दावोसला दलाल नेले; मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 7:38 PM IST

मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

बुलडाणा Ambadas Danve On CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन (CM Eknath Shinde Davos Tour) सध्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या शिष्टमंडळासोबत दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी दावोसला दलाल नेलेत. या दलालांच्या नावावर करार होणार आहे. दलालांच्या खात्यामध्ये कवडी नाही असे लोक करार करणार आणि सांगणार आम्ही एवढे कोटी आणले. तसंच आम्ही तेवढी गुंतवणूक केली, अशा शब्दात शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर टीका केलीय. दावोसला 70 लोकांला घेऊन जाण्याची गरज काय, तेही सरकारी खर्चातून? असा प्रश्न त्यांनी दौऱ्यावर उपस्थित केलाय. दावोसमध्ये हे सरकार काहीही करू शकणार नाही, आल्यावर नुसत्या थापा मारतील असंही दानवे यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details