यवतमाळ -जी तटबंदी पाकिस्तान आणि चीन सीमेवर व्हायला पाहिजे, ती तटबंदी दिल्लीच्या सीमेवर करून केंद्र सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेदरम्यान यवतमाळमध्ये बोलत होते.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची अडवणूक - जयंत पाटील
जी तटबंदी पाकिस्तान आणि चीन सीमेवर व्हायला पाहिजे, ती तटबंदी दिल्लीच्या सीमेवर करून केंद्र सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेदरम्यान यवतमाळमध्ये बोलत होते.
...तर आम्ही पंतप्रधानांचे अभिनंदन केले असते
शेतकऱ्यांना त्यांचे भविष्य अंधारात गेले असे वाटते आहे. आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र देशाचा नेता खिळे ठोकून आपल्या भोवती संरक्षण निर्माण करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. जे काम पाकिस्तान आणि चीन सीमेवर व्हायला पाहिजे, जी तटबंदी तिकडे उभारायला पाहिजे ती तटबंदी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी उभारण्यात येत आहे. मोगल बादशहा बहादुर शहा जफर याने अशीच स्वत:भोवती तटबंदी केली होती. मात्र तरीदेखील मराठा सैन्याने त्याचा पराभव केला होता. हा इतिहास विसरता कामा नये. ही तटबंदी जर सीमेवर उभारली असती, तर आम्ही नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असते अशा शद्बात जयंत पाटलांनी मोदींवर निशाणा साधला आहे.