महाराष्ट्र

maharashtra

सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझँकचा हल्ला, नुकसान भरपाईची मागणी

By

Published : Aug 16, 2020, 7:51 PM IST

पश्चिम विदर्भात कपाशीनंतर नगदी पीक म्हणून प्रामुख्याने सोयाबीन पीक घेण्यात येते. याच पिकावर पिवळा मोझँक या विषाणूजन्य रोगाने अचानक हल्ला चढविला आहे. त्यामुळे, हातातोंडाशी आलेले पीक हिरावून जाण्याची स्थिती शेतकऱ्यांवर उद्भवली आहे. त्यामुळे, कृषी विभागाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझँकचा 'अटॅक'
सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझँकचा 'अटॅक'

वाशिम- जिल्ह्यातील कृष्णा गावासह परिसरात सोयाबीन पिकांवर पिवळा मोझँक या विषाणूजन्य रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे, शेकडो एकर शेतातील उभे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधिच आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच आता हे नवीन संकट उद्भवल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पश्चिम विदर्भात कपाशी नंतर नगदी पिक म्हणून प्रामुख्याने सोयाबीन पीक घेण्यात येते. याच पिकावर पिवळा मोझँक या विषाणूजन्य रोगाने अचानक हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक हिरावून गेले आहे. म्हणून कृषी विभागाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

पिवळ्या मोझँकची लक्षणे

यामध्ये रोगट रोपाच्या पानाचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पानातील हरितद्रव्ये नाहीशी झाल्याने अन्ननिर्मितीमध्ये बाधा उत्पन्न होऊन उत्पादनात घट येते. या रोगामुळे सोयाबीन पिकांमध्ये झाडांची वाढ खुंटते. पाने लहान, आखुड, जाडसर व सुरकुतलेली होतात.

असा होतो रोगाचा प्रसार

हा रोग मुंगबीन येलो मोझँक विषाणूमुळे होतो. विषाणूची वाहक पांढरी माशी आहे. उबदार तापमान, पांढऱ्या माशींची अधिक संख्या, अतिदाट पेरणी नत्राचा अधिक वापर या सर्व गोष्टी रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरतात.

हेही वाचा-दुर्मिळ भाज्यांची मेजवानी: पालकमंत्री शंभूराजे देसाईंंच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details