महाराष्ट्र

maharashtra

वर्ध्यात कडक निर्बंधांना मुद्दतवाढ; 18 मे पर्यंत असणार कडक निर्बंध

By

Published : May 12, 2021, 8:28 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कडक निर्भंधांना मुद्दतवाढ देण्यात आली आहे. हे निर्बंध 8 मे पासून 13 मेच्या सकाळपर्यंत लागू असणार आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या अजून आटोक्यात न आल्याने निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आणखी पुढील पाच दिवस जिल्ह्यात कडक निर्बंध असणार आहे.

strict restriction increase May 18 Wardha
लॉकडाऊन वाढ वर्धा

वर्धा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कडक निर्भंधांना मुद्दतवाढ देण्यात आली आहे. हे निर्बंध 8 मे पासून 13 मेच्या सकाळपर्यंत लागू असणार आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या अजून आटोक्यात न आल्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आणखी पुढील पाच दिवस जिल्ह्यात कडक निर्बंध असणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी आहे. या सोबतच अत्यावश्यक सेवा घरपोच देणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी आणि एसडीओ सुरेश बगळे

हेही वाचा -घराच्या खोदकामात सापडले मोगलकालीन सोन्याचे शिक्के, दागिने

या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा विचार होत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत असल्याने याकडेही लक्ष देण्याची मागणी प्रहार सोशल फोरमचे सस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी दिली. शेतातील कामे सुरू असताना पेट्रोल डिझेल मिळणे बंद असल्याने ट्रॅक्टरच्या सहायाने होणारी कामे थांबली आहेत. शेतात चवळी, टमाटर, ढेमूस या सारखे पीक खराब होत चालले आहेत, याचाही विचार होणे गरजेचे, असल्याचे बाळा जगताप म्हणाले.

काय सुरू, काय बंद?

- दूध संकलन, वितरण सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सुरू असणार.

- अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी.

- किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ सर्व दुकाने बंद राहणार. सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येणार, ग्राहकांना दुकानात जाता येणार नाही.

- शिवभोजन थाळी, हॉटेल, खानावळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत केवळ घरपोच पार्सल सुविधा राहणार.

- बँक, पतसंस्था, पोस्ट ग्राहकांसाठी बंद राहील, मात्र प्रशासकीय कामकाज सुरू राहील.

- जिल्ह्याच्या सीमा रुग्ण, मालवाहतूकीकरीता सुरू असणार.

- मेडिकल, वैद्यकीय दवाखाने, पशुचिकित्सा, वैद्यकीय सेवा सुरू राहणार.

- घरपोच सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र आणि आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक.

- या काळात अत्यावश्यक सेवा, कोरोनाशी संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालये उघडे राहणार आहेत. तर, इतर सर्व कार्यालये बंद राहणार.

- या काळात खासगी आणि शासकीय प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार.

हेही वाचा -वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या आमदार कांबळेंना तत्काळ अटक करा - रामदास तडस

ABOUT THE AUTHOR

...view details