महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime News: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भर रस्त्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; अटकेनंतरही आरोपीने दाखविला माज

By

Published : Aug 3, 2023, 7:09 AM IST

Updated : Aug 3, 2023, 11:41 AM IST

सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतरही त्याने माध्यमांसमोर मग्रुरी दाखविली आहे.

Thane Crime News
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

ठाणे : शिकवणीवरून घरी परतणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीवर सराईत गुन्हेगाराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्व परिसरात बुधवारी संध्याकाळी घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तासाभरातच नराधमाला अटक केली आहे. विशाल गवळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर यापूर्वीही बलात्कारसह इतरही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


बलात्कार करण्याचा प्रयत्न :पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणी वर्गातून घरी परतत होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर भर रस्त्यात गाठून तिला रस्त्याच्या कडेला नेले. तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेला प्रकार पाहून पीडिता भयभीत झाली होती. मात्र या तिने धाडस करत त्या नराधमाला प्रतिकार केला. त्याच्या तावडीतून सुटका करून तिने घर गाठले. त्यानंतर तिच्या सोबत घडलेला प्रसंग आईवडिलांना सांगितला. घडलेला प्रकार ऐकून त्यांना धक्काच बसला.


आरोपी हा सराईत गुन्हेगार :या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली. काही तासांतच शोध घेऊन आरोपी विशाल गवळी याच्या कल्याण पूर्वेतून मुसक्या आवळल्या आहेत. त्याला बुधवारी रात्रीच्या सुमारास अटक करून पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा केलेल्या कृत्याविषयी त्याच्या चेहऱ्यावर जरादेखील पश्चात्ताप दिसला नाही. आरोपीचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांच्या कॅमेऱ्याकडे बघून दोन बोटे उंचावून विजयाची खूण दाखविली. यावरून या नराधमाला किती माज आहे, हे पोलिसांसमोर उघड झाले. आरोपीवर यापूर्वी तडीपारीची कारवाईदेखील पोलिसांनी केली होती. आज त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. MP Rape Case : मंदिरातील कर्मचाऱ्यांचे राक्षसी कृत्य!, बलात्कार केला आणि प्रायव्हेट पार्टमध्ये...
  2. Crime News : धक्कादायक! नवऱ्याने कर्ज फेडण्यासाठी केला चक्क बायकोचाच सौदा
  3. Buldana Rape Incident : बुलडाण्यातील बलात्काराची ती घटना खरी; पण महिला तक्रार देणार नाही - आ. संजय गायकवाड यांचा दावा
Last Updated : Aug 3, 2023, 11:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details