महाराष्ट्र

maharashtra

अल्पवयीन मुलाने केली 18 वर्षीय मित्राची चाकूने भोसकून हत्या

By

Published : Oct 10, 2020, 6:25 PM IST

Updated : Oct 10, 2020, 7:00 PM IST

किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एका अल्पवयीन मुलाने आपल्याच 18 वर्षीय मित्राची चाकूने भोसकून हत्या केली.

मृत अमन
मृत अमन

ठाणे - किरकोळ वादातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या 18 वर्षीय मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पूर्वेकडील बी कॅबिन परीसरात घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी विधीग्रस्त मुलास ताब्यात घेतले आहे. अमन शेख (वय 18 वर्षे), असे चाकूने भोसकून हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, अल्पवयीन आरोपी व मृत अमन हे दोघे अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झोपडपट्टीत शेजारी राहतात. शुक्रवारी (दि. 9 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास अल्पवयीन आरोपी, मृत अमन व आणखी एक मित्र असे तिघे अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पूर्वेकडील बी कॅबिन परीसरात दारू पीत बसले होते. त्यावेळी अमनने अल्पवयीन आरोपीला घरी जाण्यास सांगतच दोघांमध्ये वाद झाला. हा एवढा विकोपाला गेला की, त्या अल्पवयीन आरोपीकडे असलेला धारदार चाकू त्याने अमनच्या पोटात भोसकला. अमनच्या पोटात चाकू भोसकून अल्पवयीन आरोपीने पळ काढला. त्यांनतर अमनजवळ असलेल्या त्याच्या मित्राने काही नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरने घोषित केले.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

दरम्यान, आरोपी व मृतामध्ये दोन दिवसांपूर्वीही किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. मात्र, शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला दोघे पुन्हा एकत्र येत दारूची पार्टी करायला बसले. त्यामुळे यातील एका मित्राला किरकोळ वादातून जीव गमवावा लागल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजीतसिंग बग्गा यांनी सांगितले.

हेही वाचा -धक्कादायक! भिवंडीच्या रेडलाईट एरियात दोन वर्षांत २६ बलात्कारांच्या घटनांतील ४ पीडितांची हत्य

Last Updated :Oct 10, 2020, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details