महाराष्ट्र

maharashtra

सोलापूर जिल्ह्यातील 7 जणांचे यूपीएससी परीक्षेमध्ये यश

By

Published : Aug 4, 2020, 6:39 PM IST

यूपीएससी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील सात जणांनी यश मिळवले आहे.

यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी
यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी

सोलापूर - आज जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सात जणांनी यश मिळविले आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील अभयसिंह देशमुख, खर्डी या गावातील राहूल चव्हाण, अक्कलकोट तालुक्यातील योगेश कापसे, मंगळवेढा तालुक्यातील बावची या गावचा श्रीकांत खांडेकर, माढा तालुक्यातील उपळाई या गावातील अश्विनी वाकडे, बार्शी तालुक्यातील चूंब या गावातील अविनाश जाधव आणि अजिंक्य विद्यासागर यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे.

प्रदीप सिंहने यूपीएससीच्या सिविल सेवा (मेन्स) परीक्षा २०१९ मध्ये टॉप क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा आहे. महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. या परीक्षेतून एकूण 829 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details