महाराष्ट्र

maharashtra

Milind Ekbote : पुण्येश्वर मंदिराच्या बाजूला असलेलं अतिक्रमण हटवा अन्यथा...; मिलिंद एकबोटे यांचं वादग्रस्त विधान

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 3:10 PM IST

Milind Ekbote : पुणे शहरात असलेल्या कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर (Puneshwar Temple) परिसरात असलेल्या प्रार्थनास्थळावरुन वाद सुरू आहे. आता पुण्येश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणावर मिलिंद एकबोटेंनी वादग्रस्त विधान (Milind Ekbote Controversial Statement) केलं आहे.

Milind Ekbote
मिलिंद एकबोटे

माहिती देताना मिलिंद एकबोटे

सोलापूर : Milind Ekbote : पुण्येश्वर मंदिर (Puneshwar Temple) परिसरात असलेल्या प्रार्थनास्थळावरुन सध्या वाद सुरू आहे. या प्रकरणात पुणे पोलिसात मिलिंद एकबोटे यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावर मिलिंद एकबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चोराच्या उलट्या बोंबा अशी टीका त्यांनी केली आहे. पुण्येश्वर मंदिराच्या बाजू असलेलं अतिक्रमण हटवलं नाही तर, आम्ही पुण्यात बाबरी कांड करू असे एकबोटे यांनी वादग्रस्त विधान (Milind Ekbote Controversial Statement) केलं आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल :समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे हे बुधवारी रात्री सोलापुरात आले होते. सोलापूर शहरातील शेळगी परिसरात असलेल्या भोईराज गणेशोत्सव मंडळात त्यांनी गणपतीची महाआरती केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मिलिंद एकबोटेच्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण पुणे येथील पुण्येश्वर मंदिरावरून मिलिंद एकबोटे सह तिघांवर पुणे पोलीस स्टेशन (Pune Police Station) येथे गुन्हा दाखल झाला आहे. पुढे बोलताना एकबोटे म्हणाले की, कसल्याही परिस्थितीला किंवा गुन्ह्याला घाबरणार नाही.

काय आहे पुण्येश्वर मंदिराच प्रकरण : पुणे शहरात असलेल्या कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर परिसरात असलेल्या प्रार्थनास्थळावरुन दोन समाजात वाद सुरू आहे. ४ सप्टेंबर रोजी पुण्येश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवावे यासाठी मिलिंद एकबोटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुणे पालिकेसमोर आंदोलन केले होते. यावेळी मिलिंद एकबोटेच्या या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरी देखील आंदोलन करत एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिथावणीखोर भाषण करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अन्यथा पुण्यात आम्ही बाबरी कांड करू: पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराच्या बाजूला अतिक्रमण झाले आहे. मंदिराच्या बाजूला दर्गा बांधण्यात आला आहे. काही मशीद देखील बांधल्या आहेत. पुण्यातील समस्त हिंदू समाज याला विरोध करत आहे. मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत हिंदू बांधवांसाठी लढा सुरू केला आहे. सरकारने हे अतिक्रमण हटवले नाही तर पुण्यात बाबरी सारखे कांड करू असे वादग्रस्त विधान मिलिंद एकबोटे यांनी केले आहे. एकबोटेच्या या विधानामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा -

  1. Milind Ekbote FIR : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल
  2. Hindutva leader Milind Ekbote : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेविरोधात गुन्हा दाखल
  3. "मिलिंद एकबोटेंना वढू गावात जाण्यास बंदी घालावी"

ABOUT THE AUTHOR

...view details