महाराष्ट्र

maharashtra

कामगारानेच दुकानात १५ लाखांवर मारला डल्ला, यापूर्वीही चोरी केल्याची दिली कबुली

By

Published : Oct 2, 2020, 2:09 AM IST

साताऱ्यातील कापड व्यावसायिक सुशांत बाळकृष्ण नावंधर यांच्या कापड दुकानामधून त्यांच्याच कामगाराने १५ लाख रुपये चोरी केल्याची घटना उघडकीस आली. आहे. याप्रकरणी कामगार साहिल हाकिम याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मवंत कापड व्यावसायिक सुशांत बाळकृष्ण नावंधर यांच्या मालकीच्या नवरंग या कापड दुकानामधून कामगारानेच १५ लाखांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. आहे. याप्रकरणी कामगार साहिल हाकिम याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मवंत कापड व्यावसायिक सुशांत बाळकृष्ण नावंधर यांच्या मालकीच्या नवरंग या कापड दुकानामधून कामगारानेच १५ लाखांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. आहे. याप्रकरणी कामगार साहिल हाकिम याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा- पोवई नाक्यावरील नामवंत कापड व्यावसायिक सुशांत बाळकृष्ण नावंधर यांच्या मालकीच्या नवरंग या कापड दुकानामधून कामगारानेच १५ लाखांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. आहे. याप्रकरणी कामगार साहिल हाकिम याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत नावंधर यांच्या सिल्क पॅलेस, नवरंग साडी एम्पोरियम, नवरंग वस्त्रमहाल, नवरंग आणि नवरंग कलेक्शन अशा पाच दुकाने नाक्यावर आहेत. या पाचही दुकानातील सर्व कॅश कलेक्शन एकाच काऊंटरवर करणयात येते. येथे चाळीस कामगार कार्यरत आहे. २८ सप्टेंबर (मंगळवार) नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता विलास नावंधर यांनी दुकान उघडले आणि दुकानाच्या ड्राव्हरमधील पैसे ते मोजत असताना ते कमी असल्याचे आढळून आले.

यावेळी, दुकानातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या वरच्या मजल्यावरील होलसेल डिपार्टमेंटच्या खिडकीमधून एक व्यक्ती साडी नेसून दुकानात आल्याचे दिसले. तसेच ही व्यक्ती दुकानातील कामगार साहिल हकीम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. साहिल हा दि. २८ आणि दि. २९ असे दोन दिवस कामावरही आला नव्हता.

दरम्यान, सुशांत नावंधर हे साहिलच्या घरी गेले. यावेळी त्याला 'तु दुकानातून पैसे चोरले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले आहे' असे सांगताच साहिलने मी दुकानातून चोरी केली असून यापूर्वीही दुकानातून अशाच प्रकारे चोऱ्या केलेल्या असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details