महाराष्ट्र

maharashtra

Long March : लाँग मार्चमधील चौघांची प्रकृती बिघडली, कराडमधील सरकारी दवाखान्यात केले दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 2:30 PM IST

Long March: बेडग (ता. मिरज) गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर एका समाजाने पायी लाँग मार्च काढला आहे. त्यातील चौघांना प्रकृती खालावल्याने कराडमधील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

long march
समाजाने काढला पायी लाँग मार्च

सातारा : Long March: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बेडग (ता. मिरज) गावातील स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर एका समाजाने पायी लाँग मार्च सुरू केला (Satara News) आहे. घरांना कुलुपे लावून बॅगा भरुन हा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे. अशक्तपणामुळे या लाँग मार्चमधील चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात (Venutai Chavan Hospital) दाखल करण्यात आले आहे.



प्रकृती खालावल्याने चौघे रूग्णालयात दाखल :सांगली जिल्ह्यातील (Sangli News) बेडग (ता. मिरज) गावातील एक समाज सोडून मुंबईकडे चालत निघाला आहे. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबे या लाँग मार्चमध्ये सहभागी झाली आहेत. 16 जून रोजी बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायत विरुद्ध हा समाज, असा संघर्ष सुरू झाला होता. यातूनच या समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत माणगाव ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. हा लाँग मार्च रविवारी दुपारी कराडमध्ये दाखल झाला. यावेळी अजित कांबळे, तेजस कांबळे आणि अन्य दोन, अशा चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात (Venutai Chavan Hospital) दाखल करण्यात आले.



लाँग मार्च कराडमधून मार्गस्थ :कराडमध्ये दाखल झालेल्या लाँग मार्चमधील कुटुंबांनी रविवारी रात्री प्रीतिसंगम हॉलमध्ये मुक्काम केला. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर हा लाँग मार्च सातार्‍याकडे मार्गस्थ झाला. या लाँग मार्चमधील कुटुंबांनी सांगली जिल्हा प्रशासनाने गाव सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप करत निषेध केला. दलित कुटुंबे घरांना कुलुपे लावून चिमुकल्यांना सोबत घेऊन चालत मुंबईकडे निघाले आहेत.



दलितांच्या लाँग मार्चची अद्याप दखल नाही :मिरज तालुक्यातील बेडग गावापासून हे कुटुंबे गेल्या काही दिवसांपासून चालत मुंबईकडे निघाली आहेत. प्रमुख शहरांमध्ये रात्रीचा मुक्काम करून दुसर्‍या दिवशी ते पुढे मार्गस्थ होत आहेत. मात्र, सरकार आणि प्रशासनाने या कुटुंबांच्या या लाँग मार्चची अद्याप दखल घेतलेली नाही. गाव सोडून जाण्यास भाग पाडल्याचा आरोप करत सांगली जिल्हा प्रशासनाचा या कुटुंबांनी जाहीर निषेध केला आहे.

हेही वाचा -

  1. Pune Market Yard : लिंबू मिरची विक्रेत्यांवरील कारवाईविरोधात दलित पँथर आक्रमक; मार्केट यार्डमध्ये जोरदार आंदोलन
  2. Maratha Reservation : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळणार? हैदराबादच्या निजामांचं रेकॉर्ड तपासणार

ABOUT THE AUTHOR

...view details