महाराष्ट्र

maharashtra

"मदर्स डे" निमित्ताने कवितेतून 'आई'बद्दल रामदास आठवलेंनी व्यक्त केली कृतज्ञता

By

Published : May 9, 2022, 1:15 PM IST

Updated : May 9, 2022, 7:00 PM IST

कवितेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी कवितेच्या माध्यमातून आईबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. तसेच देशामध्ये दरवर्षी दीड लाख लोकांचा अपघाती मृत्यू होतो आणि अपघातांमध्ये अनेक मुलांचा मृत्यू होतो. त्या मृत्यूचं दुःख आईला मोठ्या प्रमाणात होत असते, असे अपघात कसे रोखता येतील ? याबाबत आपण सातत्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी चर्चा करत असतो,असेही रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

on occasion of mothers day minister ramdas athavale expressed his gratitude for mother in a poem at sangli
"मदर्स डे" निमित्ताने कवितेतून 'आई'बद्दल रामदास आठवलेंनी व्यक्त केली कृतज्ञता

सांगली - "मदर्स डे"च्या निमित्ताने रामदास आठवले यांनीही कवितेतून आई बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सांगलीमध्ये राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या "राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार" सोहळ्यामध्ये रामदास आठवले यांनी आईबद्दल कविता सादर केल्या. त्याला उपस्थितांनी चांगलीचं दादा दिली.

"मदर्स डे" निमित्ताने कवितेतून 'आई'बद्दल रामदास आठवलेंनी व्यक्त केली कृतज्ञता
कविता आणि आदर्श आई पुरस्कार सोहळा -सांगलीच्या इनाम धामणी येथील राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने "राजमाता जिजाऊ आदर्श आई"पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येतो. यंदाही हा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यामध्ये जिल्ह्यातल्या अनेक आदर्श आईंचा रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.तर कवितेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी कवितेच्या माध्यमातून आईबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. तसेच देशामध्ये दरवर्षी दीड लाख लोकांचा अपघाती मृत्यू होतो आणि अपघातांमध्ये अनेक मुलांचा मृत्यू होतो. त्या मृत्यूचं दुःख आईला मोठ्या प्रमाणात होत असते, असे अपघात कसे रोखता येतील ? याबाबत आपण सातत्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी चर्चा करत असतो,असेही रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
Last Updated : May 9, 2022, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details