महाराष्ट्र

maharashtra

सांगलीत अंत्यसंस्कार करणाऱ्या 400 हुन अधिक "वैकुंठस्नेहीं"चा हृदयस्पर्शी सत्कार

By

Published : Jun 20, 2022, 4:48 PM IST

Updated : Jun 20, 2022, 8:16 PM IST

कोरानामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही धजावत नव्हतं इतकंच काय नातेवाईक देखील चिता देण्यासाठी पुढे येत नव्हते. अशा या कठीण काळात चिता देण्यापासून अंत्यसंस्काराचे काम करणारया व्यक्तींना"वैकुंठस्नेही" म्हणून संबोधीत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील 94 गावातील 452 वैकुंठस्नेहिंचा जाहीर सत्कार करण्यात आला. कन्हेरी मठाचे प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे ज्येष्ठ विचारवंत विश्वास सायनाकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

more than 400 cremated vaikunthasnehi felicitated at islampur in sangli district
अंत्यसंस्कार करणाऱ्या 400 हुन अधिक "वैकुंठस्नेहीं"चा हृदयस्पर्शी सत्कार.

सांगली - कोरोनाच्या भयानक काळात चितेला अग्नि देण्यासाठी नातेवाईक देखील समोर येत नव्हते. मात्र, अशा वेळी गावा-गावात अनेकांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मरण पावलेल्यांच्या अंत्यविधी करण्याचे काम केलं,अशा या व्यक्तींचा "वैकुंठस्नेही"म्हणुन गौरव करण्यात आला आहे. इस्लामपूर येथे सर्जेराव यादव प्रतिष्ठानकडून तब्बल 400 हून अधिक वैकुंठस्नेहींचा हृदयस्पर्शी सत्कार पार पडला.

सांगलीत अंत्यसंस्कार करणाऱ्या 400 हुन अधिक "वैकुंठस्नेहीं"चा हृदयस्पर्शी सत्कार
वैकुंठस्नेहींचा असा ही सत्कार- समाजातला एक दुर्लक्षित घटक असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधी करणाऱ्या व्यक्तींचा अनोखा गौरव समारंभ इस्लामपूर या ठिकाणी सर्जेराव यादव प्रतिष्ठान तर्फे पार पडला. कोरोनाच्या भयंकर काळामध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणं म्हणजे एक दिव्य होते. कोरानामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही धजावत नव्हतं इतकंच काय नातेवाईक देखील चिता देण्यासाठी पुढे येत नव्हते. अशा या कठीण काळात चिता देण्यापासून अंत्यसंस्काराचे काम करणारया व्यक्तींना"वैकुंठस्नेही" म्हणून संबोधीत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील 94 गावातील 452 वैकुंठस्नेहिंचा जाहीर सत्कार करण्यात आला. कन्हेरी मठाचे प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे ज्येष्ठ विचारवंत विश्वास सायनाकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगी इस्लामपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, प्रांत अधिकारी संपत खिलारे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Last Updated : Jun 20, 2022, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details