सांगली- कर्जाला कंटाळून जत तालुक्यातील येळदरी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अर्जुन देवकाते, असे या शेतकर्याचे नाव आहे. राहत्या घरी द्राक्षबागेवर फवारण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून देवकते यांनी आत्महत्या केली आहे. द्राक्ष शेतासाठी देवकते यांनी गावातील काही जणांच्याकडून कर्ज घेतले होते. पण, ते फेडणे अश्यक्य झाल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे.
बागेसाठी आणलेले औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या -येळदरी येथील अर्जुन देवकाते ( वय 38 वर्षे ) यांनी आपल्या राहत्या घरी द्राक्ष बागेत फवारण्यात येणारे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. अर्जुन देवकते यांची शेती असून शेतात त्यांनी द्राक्षबाग उभारण्यासाठी गावातील काही लोकांकडून हातउसने कर्ज घेतले होते. पण, सततच्या नुकसानीमुळे देवकाते यांना कर्ज फेडणे अशक्य झाले होते. त्यामुळे देवकाते यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून देवकाते यांनी बुधवारी (दि. 8 जून) आत्महत्या केली.