रत्नागिरी: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार मंत्री उध्दव ठाकरेंना सोडुन शिंदे गटात सहभागी होत आहेत. आधिच 7 मंत्री शिंदे गटात पोचले आहेत. आज शिवसेना उपनेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटी ला रवाना होण्यासाठी निघाले आहे. सामंत च्या जाण्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. सामंत शिवसेना उपनेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. ते गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचा बोर्डिंग पास समोर आला आहे. चार्टर्ड विमानाच्या लिस्ट मधे त्यांचे नाव दिसत आहे.
उदय सामंत हे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते मानले जातात. त्यांचा फोन सकाळ पासून नाॅट रिचेबल लागत होता. दोन दिवसापुर्वीही त्यांचा फोन लागत नव्हता तेव्हाही त्यांच्या बद्दल शंका व्यक्त करण्यात आली होती तेव्हा त्यांनी मी गुवाहाटीला गेलो नाही गावाकडे आहे असा खुलासा केला होता. काल झालेल्या शिवसेनेच्या बैठकीलाही ते उपस्थित होते.