महाराष्ट्र

maharashtra

आता मराठा समाजाने आर्थिक निकषावरील आरक्षणासाठी पाठपुरावा करावा - ब्राम्हण महासंघ

By

Published : May 5, 2021, 6:52 PM IST

'मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे', असे अध्यक्ष अखिल ब्राम्हण महासंघ अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

pune
पुणे

पुणे - 'मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, याची कल्पना होती. दुर्दैवाने तसेच घडले आहे. मात्र, आतातरी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी पाठपुरावा करावा', असे मत ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण रद्द केले. यानंतर आनंद दवे बोलत होते.

आता मराठा समाजाने आर्थिक निकषावरील आरक्षणासाठी पाठपुरावा करावा - ब्राम्हण महासंघ

'कोणत्यातरी मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे'

'आरक्षण हे आर्थिक निकषावरच असावे. गरीब आणि गरजू व्यक्तींनाच त्याचा लाभ व्हावा, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाची पहिल्यापासूनच आहे. कोणत्याही जातीच्या आरक्षणाला आमचा पहिल्यापासून विरोध होता. मात्र, जोपर्यंत जाती आरक्षण सुरू आहे. तोपर्यंत मराठा समाजाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका होती. मात्र सध्याचे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही याची शंका होती. ती दुर्दैवाने खरी ठरली. आतातरी मराठा समाजाने आर्थिक निकषांवरील आरक्षणासाठी पाठपुरावा करावा', असे मत दवे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्‍वरराव, न्या. एस. अब्दुल नाझीर, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्याच्या एसईबीसी वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी अंतिम सुनावणी करताना हा निर्णय दिला.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीस हेच आरक्षण कायद्याच्या विरोधात; नवाब मलिक यांचा आरोप

हेही वाचा -अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; मराठा आंदोलकांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details