महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar On Raj Thackeray : मिमिक्री करणे राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क, अजित पवारांनी उडवली खिल्ली; पाहा व्हिडिओ

By

Published : May 7, 2023, 8:19 PM IST

रत्नागिरीतील सभेत शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली. त्यांचे अनुकरणही केले. याबाबत आज अजित पवारांना प्रश्न विचारला असता, राज ठाकरे मिमिक्री करण्याशिवाय दुसरे काय करू शकतात, असा सवाल करत अजित पवारांनी राज ठाकरेंना उत्तर दिले.

Ajit Pawar
Ajit Pawar

अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका

बारामती : मिमीक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांना अजित पवार ची मिमिक्री करणे, अजित पवार चे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. बारामती येथे रविवारी (दि. ७) विकासकामांचा आढावा व नियोजित दौऱ्यानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खरपुस समाचार घेतला.

राज ठाकरेंची उडवली खिल्ली :राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय दुसरे काय जमते. मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारले आहे. शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचे १४ आमदार निवडून आले होते. नंतर एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या महेशराव लांडगे यांनी मागच्या विधानसभेमध्ये त्यांच्याकडून तिकीट घेतले म्हणून मनसेचा एक आमदार त्यावेळी निवडून आला. त्यांना स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारांची मिमिक्री करणे, अजित पवारांचे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत, असे पवार यावेळी म्हणाले.

पत्रकारांवर निशाणा :ज्यांना माझे काम बघवत नाही. त्यांच्या मनात नेहमी काहीतरी असते. ज्यांचे माज्यावर मनापासून प्रेम आहे. ते माझ्याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करतात, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधक तसेच काही पत्रकारांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री कुठे गेले आहेत याच्याशी मला काय करायचे आहे. तुम्ही जसे माझ्या वॉचवर असता, तसा मी मुख्यमंत्र्यांच्या वॉचवर नाही. अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांची फिरकी घेतली.

पुन्हा पुन्हा तोच प्रश्न काय विचारतो :मुख्यमंत्री कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी गेले आहेत. याबाबत पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, मला माझे काम करू द्या, मी मुख्यमंत्रंच्या वॉचवर नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार हजर नव्हते. याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता, त्या अजित पवार संतापले पुन्हा पुन्हा तोच प्रश्न काय विचारतो. त्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हजर होते का ? असा उलट प्रश्न पवार यांनी पत्रकाराला विचारला. छगन भुजबळ हजर नसतांना हजर होते असे तुम्ही म्हणता.

आम्ही २५ जण कमिटीमध्ये :पत्रकार परिषदेपूर्वी आम्ही जेंव्हा पवार साहेबांना भेटायला गेलो तेव्हा पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेल, जयंतराव पाटील, केरळचे आमचे एक आमदार, उत्तर भारतातील आमचे नेते पीसी चाको हे देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये हजर होते. पत्रकार परिषदेमध्ये चार-पाच खुर्च्या असतात त्या ठिकाणी सगळ्यांनी गर्दी करून उपयोग नाही, असा आदेश आम्हाला साहेबांनी दिला होता. त्यामुळे साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. मात्र तुम्ही लोक काही दाखवता. माझी तेथील कामे उरकून मी पुण्याला आलो होतो. मात्र तुम्ही सांगितले दादा दिल्लीला गेले. नंतर पहाटे मी दौंड मध्ये आलो. दौंड मधील पदाधिकाºयांना मला वेळ देता आला नव्हता म्हणून मी त्यांची भेट घेतली. त्यानंतर मी आज बारामती मध्ये आलो आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar On Barsu : स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन प्रकल्प उभे करावेत - शरद पवार
  2. Earthquake Near Koyna Dam : कोयना धरणाजवळ ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; धरणापासून ५ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू
  3. Eknath Shinde on Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी लवकरच परतणार, शिंदे सरकारने 'हा' घेतला महत्त्वाचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details