महाराष्ट्र

maharashtra

NCP Political Crisis : बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला, लवकरच....; शरद पवारांची प्रतिक्रिया

By

Published : Jul 2, 2023, 4:50 PM IST

Updated : Jul 2, 2023, 7:35 PM IST

राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे (NCP Political Crisis) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on NCP Rebel) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जे पक्षाच्या चौकटीबाहेर गेले त्यांच्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राष्ट्रवादी पक्षावर कोणी (Maharshtra Political Crisis) कितीही दावा ठोकला तरी राज्यातील जनता आमच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार (Ajit Pawar NCP Rebel) यांनी दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

शरद पवार यांची पत्रकार परिषद

मुंबई/पुणे - किती लोकांनी (Maharashtra Political Crisis) वेगळी भूमिका घेतली हे अजून स्पष्ट झाले (NCP Political Crisis) नाही. नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षासह चिन्हावर दावा ठोकला (Sharad Pawar on NCP Rebel) आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे आजच सांगता येणार नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे हे बंड माझ्यासाठी नवीन नाही. असे अनेक अनुभव मला आले आहेत. राज्यातील जनता माझ्यासोबत आहे. अजित पवार यांनी बंड केल्याचे सुतोवाच शरद पवार (Ajit Pawar NCP Rebel) यांनी केले आहे.

पटेल, तटकरेंवर कारवाई - अजित पवारांच्या शपवविधीला उपस्थिती राहणे राष्ट्रवादीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भोवणार आहे. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मी केली आहे, त्यांना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही, असे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी सांगितले आहे. तसेच सुनिल तटकरे यांनीही त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचेही शरद पवारांनी सांगितले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, यापुढे पक्ष वाढवण्यासाठी दौरे करणार असेही ते म्हणाले.

प्रफुल्ल पटेल व सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई होणार आहे. तसेच जे सोडून गेले त्यांच्या राजकीय भवितव्याची मला चिंता आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांनी माझ्याशी संपर्क केला आहे. कोणी कितीही पक्षावर किंवा चिन्हावर दावा केला तरी राज्यातील जनता माझ्यासोबत आहे - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

अजित पवार उपमुख्यमंत्री - अजित पवार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनिल तटकरे हे उपस्थित होते.

शरद पवारांच्या बाजूला रोहित पवार - अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर केवळ राष्ट्रवादीतच फूट पडली नसून थेट पवार घराण्यात फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या फुटीमध्ये एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तर दुसरीकडे अजित पवार असे चित्र पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या बाजूला आमदार रोहित पवार हे बसले होते. त्यामुळे आता पवार घराण्यातच फूट पडल्याचे दिसून येत आहे.

राजकीय भवितव्याची चिंता - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. राष्ट्रवादीच्या एकूण नऊ जणांनी शपथ घेतली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, एकेकाळी माझ्यासोबत 56 आमदार होते. त्यापैकी 50 जण मला सोडून गेले होते. एका क्षणात मी फक्त सहा आमदारांचा नेता झालो. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलो, माझी भमिका मांडली. त्यानंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेल्या 50 पैकी चार ते पाच जणच निवडून आले, बाकी सगळे पडले. आताही मला सोडून गेलेल्यांची मला चिंता नाही. जे सोडून गेलेत त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे.

पटेल, तटकरेंवर कारवाई - अजित पवारांच्या शपवविधीला उपस्थिती राहणे राष्ट्रवादीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भोवणार आहे. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मी केली आहे, त्यांना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही, असे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी सांगितले आहे. तसेच सुनिल तटकरे यांनीही त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचेही शरद पवारांनी सांगितले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, यापुढे पक्ष वाढवण्यासाठी दौरे करणार असेही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
  2. NCP Political Crisis : संपूर्ण राष्ट्रवादीच शिंदे सरकारमध्ये सहभागी; पक्षासह चिन्हावर अजित पवारांचा दावा
  3. Maharashtra Political Crisis : ... म्हणून आम्ही एकत्र आलो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया
Last Updated : Jul 2, 2023, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details