महाराष्ट्र

maharashtra

Navratri 2022 : दोन्ही हाथ गमावले, पतीनेही सोडली साथ ...अशी जगतेय ही 'नवदुर्गा'

By

Published : Oct 3, 2022, 6:02 AM IST

आज एका अशा नवदुर्गाचा ( Navadurga in Pimpri-Chinchwad ) प्रवास जाणून घेणार आहोत. जिथं कुंकवाने देखील साथ सोडली आणि पतीने दुसरी पत्नी करून संसार ( husband marriage with another woman ) थाटला. सुनीता पवार अस या नवदुर्गाचे नाव असून त्यांना दोन्ही हाथ नाहीत. तरीही आपल्या मुलांसाठी आयुष्याशी दोन हाथ करून संसाराचा गाडा चालवत आहेत. सुनीता यांचे दोन्ही हाथ करंट लागल्यामुळे गमावण्याची वेळ आली अस त्या ( Loss both hands due to electric shock ) सांगतात. बारा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची कथानक सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळ्याच पाहायला मिळालं.

Navratri 2022
नवदुर्गा

पिंपरी-चिंचवड :आज एका अशा नवदुर्गाचा ( Navadurga in Pimpri-Chinchwad ) प्रवास जाणून घेणार आहोत. जिथं कुंकवाने देखील साथ सोडली आणि पतीने दुसरी पत्नी करून संसार ( husband marriage with another woman ) थाटला. सुनीता पवार अस या नवदुर्गाचे नाव असून त्यांना दोन्ही हाथ नाहीत. तरीही आपल्या मुलांसाठी आयुष्याशी दोन हाथ करून संसाराचा गाडा चालवत आहेत. सुनीता यांचे दोन्ही हाथ करंट लागल्यामुळे गमावण्याची वेळ आली अस त्या ( Loss both hands due to electric shock ) सांगतात. बारा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची कथानक सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळ्याच पाहायला मिळालं.

नवदुर्गा

करंट लागल्यामुळे हाथ गमवावे : सुनीता या आपल्या आयुष्यात दुर्गा म्हणून जगत आहेत. सुनीता पवार आणि त्यांचा पती अगदी सुखी समाधानी आयुष्य जगत होते. पण, हे नियतीला मान्य नव्हतं. त्या पती सोबत बांधकाम साईटवर काम करू लागायचा. कामावर असताना पुण्यातील वाघोली परिसरात त्यांच्या सहकारी महिलेला करंट लागला, त्या त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावल्या. परंतु, यात त्यांना गंभीर दुखापत होऊन दोन्ही हाथ गमवावे लागेले.

पतीचा दुसऱ्या महिलेशी विवाह :दोन्ही हाथ गेले तेव्हा त्या सहा महिन्यांच्या गरोदर होत्या. संमती घेऊन पतीने दुसरा विवाह केला. सुनीता त्यांच्या सवती सोबत संसार करायला लागल्या. पण, किती दिवस असा प्रश्न उपस्थित झाला, त्यात त्यांच्या संसारात खटके उडायला लागले. म्हणून, पती त्यांना कायमच सोडून गेला. तरी त्यांनी हार मानली नाही. अनेकदा त्यांच्या मनात नैराश्याने घर केले एवढंच नाही तर आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलायचे असा मनात विचार आला. पण, दोन सोन्या सारखी लेकरं पाहून हा निर्णय मनातून काढून टाकला. आज सुनीता पवार यांची मुलगी सातवीत शिक्षण घेते तर, लहान मुलगा हा पहिलीत शिकतो आहे. सुनीता पवार या दोन्ही हाथ नसताना स्वयंपाक आणि स्वतः ची काम करू शकतात. जे अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. अनेकांना नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा विचार सुचतो अशा व्यक्तीने सुनीताकडे पाहून जीवन कस जगायला हवं हे शिकण्याची नितांत गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details