महाराष्ट्र

maharashtra

Bhagat Singh Koshyari : 'मी स्वत:ला राज्यपाल मानतच नाही', भगतसिंह कोश्यारी नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत

By

Published : Dec 9, 2022, 3:15 PM IST

'मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, ( I do not consider myself a governor ) असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) त्यांच्या या वक्तव्यामुळे कोश्यारी पुन्हा एकदा नव्या चर्चेत आले ( Controversy of Governor Bhagat Singh Koshyari ) आहेत.

Bhagat Singh Koshyari
भगतसिंग कोश्यारी

पुणे :वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) पुन्हा एकदा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले ( Controversy of Governor Bhagat Singh Koshyari ) आहेत. 'मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, ( I do not consider myself a governor ) असे वक्तव्य पुण्यात एका कार्यक्रमात महिलेला उत्तर देताना केल्याने राज्यपाल कोश्यारी चर्चेत आले आहेत. डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, ( Deccan Chamber of Commerce ) इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) तर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मी स्वत:ला राज्यपाल मानतच नाही'

तुम्ही आम्हाला दिसत नाहीत -भाषण सुरू होताच एका महिलेने उभे राहून राज्यपाल कोश्यारी यांचं भाषण थांबवत त्यांना 'राज्यपाल तुम्ही आम्हाला दिसत नाहीत', असे म्हणत तक्रार मांडली. कार्यक्रमात या महिलेला उत्तर देताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, 'मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही. तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला'. इतकंच नव्हे, तर महिलेच्या तक्रारीनंतर भाषण सुरू असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छायाचित्रकारांना देखील बाजूला व्हायचे आदेश दिले.

मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही -आधीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून दूर करावं अशी मागणी होत असताना स्वतः राज्यपालांनीच 'मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही', असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details