महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे शहरात शुक्रवारी १८०५ कोरोना रुग्णांची नोंद

शहरात गेल्या काही दिवसात दररोज १५०-२०० नवे रुग्ण शहरात आढळून येत आहेत. आज दिवसभरात ८ हजार ८६०२ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. तर दिवसभरात ५९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर मागील २४ तासांत १३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

pune corona
पुणे कोरोना

By

Published : Mar 12, 2021, 8:05 PM IST

पुणे -शहरावरील कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होताना दिसते आहे. आज (शुक्रवारी) १२ मार्चला दिवसभरात १८०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १३ बाधितांचा मृत्यू झाला. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

३४१ क्रिटिकल रुग्ण -

शहरात गेल्या काही दिवसात दररोज १५०-२०० नवे रुग्ण शहरात आढळून येत आहेत. आज दिवसभरात ८ हजार ८६०२ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. तर दिवसभरात ५९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर मागील २४ तासांत १३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या ३४१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात एकूण बाधितांची संख्या २ लाख १४ हजार ८३०वर पोहोचली आहे. तर सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ९७४० इतकी आहे. आजपर्यत ४ हजार ९२५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण २ लाख १६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनामुळे रात्रीची संचारबंदी -

राज्यात सगळीकडे पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यामुळे यावर आळा घालण्यासाठी प्रशानसनाने रात्री अकरा ते पहाटे पाचवाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा -बच्चू कडूंनी लॉकडाऊन केला रद्द; अकोलेकरांना दिलासा

शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद -

कोरोनावर आळा घालण्यासाठी पुण्यातील शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररी पन्नास टक्के क्षमतेनूसार विद्यार्थांना वापरता येणार आहेत. तसेच शहरात हॉटेल १० वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आसनक्षमेच्या ५० टक्के लोकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तर होम डिलीव्हरी ११ वाजेपर्यंत करता येणार आहे. तर थिएटर, मॉल्स आणि दुकानांनाही रात्री दहावाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लग्न समारंभारत ५० टक्के लोकांनाच परवानगी -

लग्न समारंभ, धार्मिक विधी, सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीप्रसंगी तसेच दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील बागा फक्त सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या व्यक्ती हे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सौरभ राव म्हणाले.

हेही वाचा -...तर नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागेल - चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details