महाराष्ट्र

maharashtra

कौतुकास्पद! 25 वर्षीय तरूणाने कोरोनावर मात करत माउंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा

By

Published : Jun 8, 2021, 7:36 PM IST

Updated : Jun 8, 2021, 7:56 PM IST

कोरोनावर मात करत नव्या जोमाने त्याने प्रवास सुरू करत माउंट एव्हरेस्टवर चढाई केली. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात उद्भवलेल्या तीन चक्रीवादळाचा परिणामही त्याच्या या मोहिमेत त्याला जाणवला. सगळ्या आवाहानाला सामोरे जात हर्षवर्धनने अखेर माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली व भारताचा तिरंगा तसेच वसई विरार महानगरपालिकेची ओळख असलेला झेंडा अभिमानाने फडकवला.

पालघर
पालघर

वसई (पालघर) -कोरोनाने जगभरात थैमान घातले असताना वसईतील एका गिर्यारोहकाने त्याला कोरोनाची लागण झाली असतानाही त्यावर मात करत माउंट एव्हरेस्ट या उच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकवला आहे. तब्बल 65 दिवसानंतर हर्षवर्धन जोशीचे वसईत आगमन झाले असून त्याच्यावर वसईकरांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

कोरोनावर मात करत माउंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा

असा सुरू झाला प्रवास

वसई पश्चिम दिवाणमान येथे राहणाऱ्या 25 वर्षीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या हर्षवर्धन जोशी याचे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न होते. गेल्या तीन वर्षांपासून तो या तयारीला लागला होता. या मोहिमेसाठी तब्बल 60 लाख रूपये त्याला जमा करायचे होते. त्यासाठी त्याने एका वेबसाईटच्या माध्यमातून आवाहन करत जवळपास 18 लाख रूपये जमा केले. त्याचप्रमाणे स्वत:च्या बचतीमधून तसेच ट्रेकिंग ग्रुपमधील लोकांनी त्याला मदत केली होती. वसई विरार महानगरपालिकेकडूनही त्याला चार लाख रुपये या मोहिमेसाठी मदत म्हणून देण्यात आले होते. 30 मार्चला या मोहिमेसाठी हर्षवर्धनने वसईतून निघाला. प्रत्यक्ष मोहीम 6 एप्रिलला सुरू झाली. मात्र मोहिमेच्या सुरूवातीलाच हर्षवर्धनचे दुर्दैव आडवे आले. त्याला कोरोनाची लागण झाली आणी त्याला मोहीम थांबवावी लागली. काही दिवसातचे हर्षवर्धनने कोरोना मात केली.

असा केला माउंट एव्हरेस्ट सैर

कोरोनावर मात करत नव्या जोमाने त्याने प्रवास सुरू करत माउंट एव्हरेस्टवर चढाई केली. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात उद्भवलेल्या तीन चक्रीवादळाचा परिणामही त्याच्या या मोहिमेत त्याला जाणवला. सगळ्या आवाहानाला सामोरे जात हर्षवर्धनने अखेर माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली व भारताचा तिरंगा तसेच वसई विरार महानगरपालिकेची ओळख असलेला झेंडा अभिमानाने फडकवला. सातोरी अ‌ॅडव्हेंचर एव्हरेस्ट या संस्थेकडून हर्षवर्धन जोशी, फूर्टे शेरपा व अनूप राय हे तीनजण एव्हरेस्ट मोहिमेवर गेले होते. साधारणत: गिर्यारोहक थंडीपासून बचाव करण्यासाठी सोबत डिझेल जाळण्यासाठी नेत असतात. मात्र यांनी सोबत मोबाइल सोलर पॅनलचा वापर केला होता. हर्षवर्धनने मोहिमेच्या आधी वसई विरार महानगरपालिकेला आपण एव्हरेस्ट मोहिमेवर जात असल्यामुळे आपल्याला लसीकरण करण्यात यावे म्हणून विनंती केली होती. पालिकेनेही याबाबत त्याला सहकार्य करत त्याला लस टोचून दिली होती. त्याचा मोठा फायदा त्याला झाला असल्याचे त्याने सांगितले आहे. 23 मेला पहाटे 6:30 ला त्याने एव्हरेस्ट सर केले त्यानंतर तो बेसकॅम्पवर मोहीम फते करून उतरला. तो आता शनिवारी वसईत घरी परतला आहे. वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर प्रविण शेट्टी, माजी सभापती भरत गुप्ता तसेच महापौरांचे खाजगी सचीव दिगंबर पाटील यांनी पालिकेकडून त्याला आर्थिक मदत मिळवून दिली होती.

हेही वाचा -नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने केले रद्द

Last Updated : Jun 8, 2021, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details