महाराष्ट्र

maharashtra

नांदगावच्या बोलठाणमध्ये मुसळधार पाऊस; बैलगाडी गेली वाहुन

By

Published : Jun 17, 2021, 1:54 PM IST

जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाणला काल (बुधवारी) सायंकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी, नाले, ओढ्याना पूर आला. या पुरात बैलगाडी वाहून गेल्यामुळे 2 बैलांचा मृत्यू झाला आहे.

पूरात २ बैलांचा मृत्यू
पूरात २ बैलांचा मृत्यू

नांदगाव (नाशिक)- नांदगावच्या ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बोलठाणसह इतर काही गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. या पुरात बैलगाडी वाहून गेल्यामुळे 2 बैलांचा मृत्यू झाला, तर शेतकऱ्याला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

नांदगावच्या बोलठाणमध्ये मुसळधार पाऊस

2 बैलांचा दुर्दैवी मृत्यू

जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाणला काल (बुधवारी) सायंकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाने नदी, नाले एक होऊन वाहत होते तर अनेक ठिकाणी पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसात शरद बापू चव्हाण यांची बैलगाडी वाहून गेली. यात 2 बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र चव्हाण यांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. बोलठाणसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जातेगाव व बोलठाणला जोडणारा पुलावरून पाणी वाहत असल्याने या दोन्ही गावाशी संपर्क तुटला होता.

गावांचा संपर्क तुटला

जातेगाव व बोलठाण या दोन्ही गावाला जोडणारा पूल या पावसामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेला. या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. काही तासानंतर पाणी ओसरले, त्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा -मुंबईत कुठेही पाणी न साचल्याने रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत

ABOUT THE AUTHOR

...view details