महाराष्ट्र

maharashtra

आरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक, द्वारका येथे रास्ता रोको आंदोलन

By

Published : Jun 17, 2021, 3:57 PM IST

न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. समता परिषदेने नाशिकच्या द्वारका चौफुली येथे रास्ता रोको करत आंदोलन केले. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

nashik
nashik

नाशिक -सर्वोच्चन्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचवण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मागण्या घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सर्व ओबीसी संघटनांनी गुरुवारी (17 जून) द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक

छगन भुजबळांच्या नेतृत्त्वात आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. समता परिषदेने नाशिकच्या द्वारका चौफुली येथे रास्ता रोको करत आंदोलन केले. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आले. सध्या या आंदोलनासाठी स्वत: छगन भुजबळ हे रस्त्यावर उतरले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समता परिषदेचे कार्यकर्ते हातात निषेध फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. तर काहीजण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा करून या आंदोलनात सहभागी झाले होते.

ओबीसी आरक्षणासाठी सर्व संघटना एकत्रित

आंदोलन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनाला सुरुवात होताच आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. ओबीसी समाजाचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरत आहेत. ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात विविध ओबीसी संघटना एकत्रित आल्याचे चित्र आहे.

हेही वाचा -Sonu Sood ला Bombay HC ने फटकारले, "तुम्ही देवदूत असल्याचा जनतेसमोर भास निर्माण केला"

ABOUT THE AUTHOR

...view details