नाशिक: नाशिकमध्ये लाचखोरांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधकाला तब्बल 30 लाखांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले होते. आता नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी वैशाली धनगर आणि लिपिक नितीन जोशी हे लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.
पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पकडले: नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि शिक्षक विभागाचा लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. तब्बल पन्नास हजाराची लाच स्वीकारताना हे दोघे सापडले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यानंतर अधिक चौकशीसाठी धनगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे, सध्या त्यांचीच कसून चौकशी सुरू आहे.
एसीबीने रंगेहात पकडले:एक निलंबित मुख्याध्यापिकेला कामावर रुजू करायची होते. त्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी धनगर आणि जोशी यांनी पन्नास हजाराच्या लाचेची मागणी केली होती. यातील लिपिक जोशी यांनी पाच हजार रुपये स्वीकारले तर 45 हजार रुपये शिक्षण अधिकारी धनगर यांना स्वीकारतांना एसीबीने रंगेहात ताब्यात घेतलं..