महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Crime :...म्हणून बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या; नाशिकच्या कातरणी गावातील घटना

बापानेच मुलाची हत्या ( Father Murder Son In Nashik ) केल्याची धक्कादायक घटना येवला तालुक्यातील कातरणी गावात घडली आहे. चुकीच्या मुलीशी लग्न लाऊन दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. या भांडणातच मुलाचा मृत्यू झाला.

Nashik Crime News
Nashik Crime News

By

Published : May 16, 2022, 3:29 PM IST

येवला ( नाशिक ) - बापानेच मुलाची हत्या ( Father Murder Son In Nashik ) केल्याची धक्कादायक घटना येवला तालुक्यातील कातरणी गावात घडली आहे. मुलगा दारू पिऊन आला असता माझे चांगल्या मुलीशी लग्न लावून न दिल्याने पत्नी मला सोडून गेली. या कारणावरून बाप मुलांमध्ये भांडण झाले. या भांडणांमध्ये बापाने मुलाला उचलून रोडवर आपटल्याने यात मुलाचे डोके फुटून रक्तस्राव सुरू झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी बापाला अटक केली आहे.

आरोपी बापाला अटक -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मुलाचे नाव संदिप बाळासाहेब आगवणे (३२) आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी त्यास सोडून निघून गेली होती. १५ मे २०२२ रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास संदिप दारु पिऊन आला. त्याचे वडील बाळासाहेब अण्णासाहेब आगवणे (५०) यांच्याशी त्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर कातरणी ते समीट रेल्वे स्टेशन रोडवर कातरणी शिवारात त्या दोघांची मारामारी झाली. झालेल्या भांडणांत बापने मुलाला उचलून डोक्यावर आपटल्याने त्याचे डोक्यास अंतर्गत गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा -Kirit Somaiya on Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार - भाजप नेते किरीट सोमैया

ABOUT THE AUTHOR

...view details