नंदुरबार - एनए-डेक्स अॅप डाऊनलोड करण्याचे सांगुन एका नोकरदाराच्या खात्यातुन वेळोवेळी ऑनलाईनने पैसे ट्रान्सफर करुन तब्बल तीन लाखात गंडविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर याबाबत माहिती देताना ऑनलाइन खरेदीतून फसवणूक -
नंदुरबार येथील पटेलवाडीत राहणारे वसंतकुमार नरेंद्रप्रसाद सिंह यांनी ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातुन फ्लिपकार्डद्वारे ब्ल्युटुथ स्पिकर मागविला होता. या स्पिकरमध्ये पावर बटन काम करीत नसल्याने त्यांनी फ्लिपकार्ड कंपनीला ऑनलाईन तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीचे निवारण होत नसल्याने वसंतकुमार सिंह यांनी बोट कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क केला. यावेळी समोरील व्यक्तीने फोन उचलल्यावर दुसर्या क्रमांकावरुन कॉल करतो, असे सांगितले.
हेही वाचा -शेतकऱ्यांना खुनी ठरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा प्रवास ऱ्हासाच्या दिशेने - शिवसेना
फोन पेतून पैसे ट्रान्सफर -
संशयिताकडून दुसर्या क्रमांकावरुन फोन आल्यावर सदर व्यक्तीने स्पिकरमधील दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईनने "फोन पे" द्वारे 1 रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर एनए-डेक्स अॅप डाऊनलोड करण्याचे सांगत सदर व्यक्तीने वेळोवेळी वसंतकुमार सिंह यांच्या खात्यातुन 2 लाख 99 हजार 994 रुपये परस्पर बँक खात्यातुन ट्रान्सफर करुन घेतले. यामुळे वसंतकुमार सिंह यांची ऑनलाईन फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत वसंतकुमार नरेंद्रप्रसाद सिंह यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियाचा गैरवापर करून आतापर्यंत झालेले गुन्हे -
सोशल मीडियाच्या गैरवापर करून फसवणूकीतून सन 2019 मध्ये 19 गुन्हे दाखल झाले होते. तर 2020 मध्ये 18 गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांबाबत नंदुरबार सायबर सेलमध्ये अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.