महाराष्ट्र

maharashtra

नंदुरबारमध्ये 73 वर्षीय वृद्धाने केली कोरोनावर मात

By

Published : May 6, 2021, 4:11 PM IST

Updated : May 6, 2021, 4:58 PM IST

नंदुरबार जिल्ह्यातील वड़ाळी येथील 73 वर्षीय वृद्धाने हिंमत न हारता कोरोनावर मात केली आहे.ते विठोबाचे निस्सीम भक्त असून शेकडो किलो मीटरची पायी वारी केल्याने त्यांची प्रतिकार शक्ती वाढली असल्याने त्यांनी या वयात कोरोनावर मात केली असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.

nandurbar latest news
नंदुरबारमध्ये 73 वर्षीय वृद्धाने केली कोरोनावर मात

नंदुरबार - कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर होत असताना अनेक तरुणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील वड़ाळी येथील 73 वर्षीय वृद्धाने हिंमत न हारता कोरोनावर मात केली आहे.

प्रतिक्रिया

कोरोनावर जिद्दीने केली मात -

शहादा तालुक्यातील वडाळी येथील एका ७३ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. वाढते वय आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी 60 पर्यत पोहचल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर 10 दिवस उपचार केल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. हे 73 वर्षीय वृद्ध विठोबाचे निस्सीम भक्त आहेत. तब्बल 12 वर्ष त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने नंदुरबार ते पंढरपूर अशी वारी केली आहे. त्यामुळे त्याच शरीर काटक झाले आहे. शेकडो किलो मीटरच्या पायी प्रवासाने त्यांची प्रतिकार शक्ती वाढली असल्याने त्यांनी या वयात कोरोनावर मात केली असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.

पिता-पुत्राने घेतला एकाच वेळी उपचार -

याचदरम्यान, त्यांचे ४५ वर्षीय मुलगीदेखील कोरोनाबाधित झाला होता. त्यामुळे दोन्ही पिता-पुत्रांनी एकाच वेळी जिल्हा शासकीय रुग्णलयात उपचार घेतले. वडीलांप्रमाणे त्यांनी देखील कोरोनावर मात केली आहे. न घाबरता वेळीच उपचार घेतल्याने कोरोना बरा होतो असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - 'सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे केलेले कौतुक ही विरोधकांना चपराक'

Last Updated : May 6, 2021, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details