महाराष्ट्र

maharashtra

CM Eknath Shinde Health : मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत संजय राठोड यांची मोठी अपडेट; म्हणाले, गंभीर...

By

Published : Aug 13, 2023, 10:48 PM IST

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या प्रकृतीच्या कारणास्तव विश्रांतीसाठी साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावी गेले आहेत. अशातच यावर मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर नाही. राज्यात सध्या सर्दी, ताप ही लक्षणे सुरू असल्याचे संजय राठोड म्हणाले.

Minister Sanjay Ratho
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड

प्रतिक्रिया देताना मंत्री संजय राठोड

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली होती. यावर मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर नाही. राज्यात सध्या सर्दी, ताप ही लक्षणे सुरू आहेत. असाच सर्दी, ताप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आला असावा, ते उशिरापर्यंत काम करत असतात. कदाचित त्यांना कामामुळे ताप किंवा बीपीचा त्रास झाला असावा. याबद्दल मला अधिक माहिती नाही. आमचे सहकारी आमदार संजय शिरसाट यांना विचारून आपल्याला माहिती देतो, असे राठोड म्हणाले.

अफवा नेहमी सुरू असतात : शिंदे गटाचे 10 आमदार पुन्हा ठाकरे गटात परततील असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले होते. आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. अशा अफवा अगोदरपासूनच पसरवल्या जात आहेत. हे सरकार दोन महिने चालणार अशा अफवा नेहमी सुरू आहेत. परंतु हे सरकार मजबूत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर नाही. राज्यात सध्या सर्दी, ताप ही लक्षणे सुरू आहेत. असाच सर्दी ताप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आला असवा. कदाचित त्यांना कामामुळे ताप किंवा बीपीचा त्रास झाला असावा - संजय राठोड, मंत्री

ठाण्यातील दुर्घटनेची चौकशी : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांचा झालेला मृत्यू ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया, मंत्री संजय राठोड यांनी दिली. संजय राठोड हे नांदेडच्या हिमायतनगर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी राठोड यांनी ही प्रतिक्रिया दिली. या दुर्घटनेची चौकशी सुरू असून ही घटना नेमकी कशामुळे झाली हे चौकशीनंतर समोर येईल, असे राठोड म्हणाले.

रोग निदान उपचार शिबिराचे उद्घाटन : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगवी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने, सर्व रोग निदान उपचार शिबिर आज हिमायतनगर येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन संजय राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, आनंदराव जाधव, आमदार बालाजीराव कल्याणकर, संदेश पाटील, हडसणीकर, शीतल भागे पाटील तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सर्व रोग निदान उपचार शिबिराचे आयोजन लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने करण्यात आले होते.

हेही वाचा -

  1. Kalwa Hospital Patient Death Case: कळवा हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे थैमान; अश्रू.. हुंदके आणि टाहो
  2. Kalwa Hospital Thane : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 48 तासात 18 रुग्ण दगावले, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
  3. Kalwa Hospital Death Incident : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील कळवा रुग्णालय बनले मृत्यूचा सापळा; विरोधक आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details