महाराष्ट्र

maharashtra

Food Poisoning News: कंदुरी बेतली जीवावर; कंदुरी जेवणातून 27 जणांना विषबाधा, रुग्णांवर उपचार सुरू

By

Published : May 4, 2023, 10:58 AM IST

माहूर तालुक्यातील वानोळातांडा येथे कंदुरीच्या कार्यक्रमात मटण खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली. बुधवारी २७ जणांना ही बाधा झाली आहे. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

Food Poisoning News
कंदुरी जेवणातून विषबाधा

नांदेड :वानोळातांडा येथे 3 मे रोजी कंदुरीचा कार्यक्रम होता. कंदुरीच्या कार्यक्रमासाठी आदल्या दिवशी रात्रीच पदार्थ आणून फ्रीजमध्ये ठेवले होते. मात्र रात्रभर गावात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. वादळी वारा व अवकाळी पावसामुळे परिसरातील लाईट बंद होती. त्यामुळे फ्रीज बंद पडले. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ निकामी झाले होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. परिणामी विषबाधेचा हा प्रकार झाला.

२७ जणांना विषबाधा : हे मटण खाल्ल्याने दत्ताराम राठोड (वय ४०), बळीराम राठोड (वय ६५), नितीन राठोड (वय ३०), विलास पवार (वय ४७), संगीता राठोड (वय ३४), नम्रता राठोड (वय २६), सृष्टी पवार (वय ११), हरीश राठोड (वय १०), क्रिश राठोड (वय ५), त्रिशा राठोड (वय३), अनिल राठोड (वय ४५), संतोष चव्हाण (वय ४५), सोनू राठोड (वय २५), क्रांती राठोड (वय २०), ललिता राठोड (वय ३०) प्रांजल राठोड (वय ४), विजय राठोड (वय ४०), कोमल राठोड (वय ६०), रामराव राठोड (वय ३५), शिवपाल राठोड (वय ३६), नमिबाई जाधव (वय ६०), भारती पवार (वय १८), रंजना राठोड (वय ३५), चंद्रकला राठोड (वय ३०), जागेश्वर आडे (वय ५२), अर्जुन चव्हाण (वय ५०), प्रेमीलाबाई आडे सर्व रा. वानोळातांडा अशा २७ जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना बुधवारी दुपारी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे.



विद्युत पुरवठा बंद : मागील दहा दिवसापासून जिल्हाभरात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. यामुळे काही भागात लाईटचे खांब तुटून पडले आहेत. परिणामी विद्युत पुरवठा ही बंद झाला. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा महावितरणच्या वतीने बंद करण्यात येतो आहे. कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये, यासाठी हा विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. प्रत्यक्ष वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले, पण वादळी वाऱ्याचा असाही फटका बसताना दिसत आहे.

हेही वाचा : Children died in Virar विरारमध्ये जेवणातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील 2 मुलांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details