महाराष्ट्र

maharashtra

'मराठा आरक्षण' न्यायालयात टिकवण्यात राज्य सरकार अपयशी - सुधीर मुनगंटीवार

By

Published : Nov 29, 2020, 7:21 PM IST

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. परंतु, या सरकारने ३६५ दिवसात ३६५ प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय मराठा आरक्षण देखील न्यायालयात टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. अशी टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Maratha reservation Mungantiwar view
सुधीर मुनगंटीवार

नागपूर - राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. परंतु, या सरकारने ३६५ दिवसात ३६५ प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय मराठा आरक्षण देखील न्यायालयात टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. अशी टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

नागपुरात पार पडलेल्या भाजप पदवीधर निवडणूक मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. तसेच, फडणवीस सरकारने मराठा आरक्षण टिकावे म्हणून वारंवार प्रयत्न केले. मात्र, सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने मराठा समाज व जनतेच्या अपेक्षाभंग करण्याचे काम केले. असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला. तसेच, वर्षपूर्तीवरून विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होत आहे. राज्य सरकारने जनतेच्या अपेक्षाभंग केल्या, शेतकऱ्यांनाही खोटी आश्वासने दिली. जनतेच्या मतांचा अनादर झाला आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

माहिती देताना सुधीर मुनगंटीवार

राज्य सरकारकडून निराधारांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

राज्य सरकारकडून निराधारांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे, राज्य सरकारकडून सर्वसामान्यांवर अन्याय झाला आहे. शिवाय वाढीव प्रश्न निर्माण करण्याचे पराक्रम या सरकारने केले आहे. हे सरकारचे मोठे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसण्याची संधी मिळाली. परंतु, त्या संधीचे सोने त्यांना करता आले नाही. किंबहुना लोकांच्या मनातील सिंहासनावरून ते हद्दपार झाले, अशी कोपरखळी मुनगंटीवार यांनी फडणवीस यांना मारली.

उदयन राजे यांचे मत हे जनतेचे मत

शिवाय, उदयन राजे यांचे मत हे जनतेचे मत आहे. ते फक्त राज्य घराण्यातील खासदाराचे मत नाही. त्यामुळे, पुढील योग्य ते निर्णय जनताच घेईल, असा आशावादही मुनगंटीवार यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा -नागपुरातून परराज्यात जाणाऱ्या बस फेऱ्यांमध्ये वाढ; प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद

ABOUT THE AUTHOR

...view details